मुंबई :
मराठी चित्रपट चित्रपटगृहात चालत नाही असं अनेकदा म्हटलं जात पण अश्यातच नुकत्याच प्रदर्शित झालेल्या नवरा माझा नवसाचा २ या चित्रपटाने चित्रपट गृहात यशस्वी ५० दिवसाचा पल्ला गाठला आहे. मराठी चित्रपटसृष्टी साठी ही बाब नक्कीच कौतुक करण्यासाठी आहे.
२०२४ वर्षात निर्माता म्हणून पदार्पण करणारा स्वप्नील जोशींच्या दोन्ही चित्रपटाने (नाच गं घुमा आणि नवरा माझा नवसाचा २) चित्रपटगृहात यशस्वी ५० दिवसाचा पल्ला गाठला आहे. एक अभिनेता आणि निर्माता म्हणून त्याचासाठी ही गोष्ट खूप अभिमानास्पद आहे. या दोन्ही चित्रपटात त्याने दुहेरी भूमिका साकारल्या असून स्वप्नील साठी हे वर्ष अजून जास्त खास झालं आहे.
नाच गं घुमा चित्रपटातून त्याने निर्मिती विश्वात पदार्पण केल्यानंतर चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर उत्तम कमाई करून आता नुकत्याच प्रदर्शित झालेल्या नवरा माझा नवसाचा २ मध्ये देखील त्याने मुख्य भूमिका बजावून हा चित्रपट सुपरहिट केला. हाऊसफुल्ल चित्रपट आणि ५० दिवसाचा यशस्वी पल्ला गाठणारे स्वप्नीलचे २०२४ मधले हे दोन मुख्य चित्रपट आहेत.
स्वप्नील कायम चर्चेत असलेला अभिनेता म्हणून ओळखला जातो आणि अश्यातच पुन्हा एकदा स्वप्नील ने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं काही दिवसापूर्वी स्वप्नील ने निर्माता म्हणून अजून एका चित्रपटाची घोषणा केली असून ” सुशीला- सुजीत” हा नवा चित्रपट २०२५ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.