मुंबई :
मानखुर्द-शिवाजीनगर येथील महाविकास आघाडी समाजवादी पार्टीचे उमेदवार अबू आझमी यांच्या प्रचारार्थ शिवाजी नगर मध्ये जाहिर सभा घेण्यात आली होती. या सभेला शिवसेना उपनेते सचिन अहिर तसेच ईशान्य मुंबई महाविकास आघाडीचे खासदार संजय दिना पाटील उपस्थित होते.
पुर्व उपनगरातील मानखुर्द-शिवाजी नगर मतदार संघ हा समाजवादी पार्टीचा बालेकिल्ला असून या भागातून महाविकास आघाडीचे उमेदवार अबू आझमी निवडणुक रिंगणात आहेत. तर राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार) पक्षाचे उमेदवार नवाब मलिक व शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे बुलेट पाटील हे उमेदवार देखील या मतदारसंघातून आपले नशिब आजमावणार आहेत. त्यामुळे या मतदारसंघात तिरंगी लढत होणार असून मुस्लिम मते निर्णायक ठरतील.
मानखुर्द-शिवाजी नगर मतदारसंघात ८० टक्क्यांहून अधिक झोपडपट्टी असून या भागात डंपिंग, प्रदुर्षण, पिण्याचा पाण्याचा प्रश्न, रुग्णालयाची असुविधा, आदी समस्या भेडसावत आहेत. या मतदारसंघातून अबू आझमी सलग तीन वेळा आमदार म्हणुन निवडून आले आहेत.
ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांनी मानखुर्-शिवाजी नगर भागातील समस्या वारंवार पालिका अधिका-यांसमोर मांडल्या आहेत. त्यावर काम देखील सुरु झाले असून राजावाडी, सायन रुग्णालयाचे नुतनीकरण तसेच नविन रुग्णालयाचे काम ही लवकरच सुरु करण्यात येणार आहे. त्याच बरोबर या भागातील प्रदुर्षण व डंपिंग बाबत खा. संजय दिना पाटील यांनी संसदेतही हा प्रश्न उपस्थित केला होता. त्यामुळे या भागातील अनेक समस्या सुटण्याच्या मार्गावर आहेत. खा. संजय दिना पाटील यांनी गेल्या सात महिन्यात केलेल्या कामाचा फायदा अबू आझमी यांना होणार आहे. त्यामुळे त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे.