नवी मुंबई :
देशात सध्या फुफ्फुसाच्या कर्करोगाच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ दिसून येत आहे. वाढत्या फुफ्फुसाच्या कर्करोगावर मात करण्यासाठी कर्करोगावर प्रभावीपणे उपचार देणा-या अपोलो कर्करोग केंद्रात आता देशातील पहिला लंगलाइफ स्क्रिनिंग प्रोग्राम सुरु झाला आहे. सध्या देशात आढळून येणा-या एकूण कर्करोगाच्या रुग्णांपैकी ५.९ रुग्णांना फुफ्फुसाच्या कर्करोगाने ग्रासले आहे. तर देशात कर्करोगाच्या विळख्यामुळे होणा-या मृत्यूपैकी ८.१ टक्के रुग्णांच्या मृत्यूला फुफ्फुसाचा कर्करोग कारणीभूत ठरला आहे. ही भयावह आकडेवारी ध्यानात घेत अपोलो कर्करोग केंद्राने जीवघेण्या फुफ्फुसाच्या कर्करोगावर मात करण्यासाठी लंगलाइफ स्क्रिनिंग प्रोग्राम सुरु करण्याचे निश्चित केले. फुफ्फुसाच्या आजाराचे वेळीच निदान व्हायले हवे. वेळेवर या कर्करोगाचे निदान झाले तर रुग्णांचा जीव वाचवणे शक्य होते. इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर (आयएआरसी)च्या पुढाकाराने ग्लॉबोकॅन २०२० च्या अहवालात कर्करोगाच्या नोंदी आणि मृत्यूबाबत संशोधन करण्यात आले. या अहवालानुसार २०२० साली १.८ दशलक्ष (१८टक्के) रुग्णांचा फुफ्फुसाच्या कर्करोगामुळे मृत्यू झाला.
५० ते ८० वयोगटातील रुग्ण, कर्करोगाचे कोणतेही लक्षण न दिसून येणारे रुग्ण तसेच धूम्रपान करणा-या व्यक्ती, फुफ्फुसाचा कर्करोग झालेल्या रुग्णांचे कुटुंबीय या सर्व वर्गवारीतील रुग्णांच्या वेळीच निदानासाठी तत्परतेने तपासणी करता यावी म्हणून लंगलाइफ स्क्रिनिंग प्रोग्राम सुरु करण्यात आला आहे. फुफ्फुसाचा कर्करोगाच्या निदानासाठी अत्यल्प प्रमाणातील कॉम्प्युटेड टोमोग्राफी तपासणी केली जाते. फुफ्फुसाच्या कर्करोगाचे निदान झाल्यास त्वरित उपचार सुरु करता येतात. जेणेकरुन रुग्णाचा जीव वाचवण्याची शक्यता दुणावते. दुर्दैवाने, फुफ्फुसाचा कर्करोग बळकावण्याची ८० टक्के उच्च जोखीमेच्या रुग्ण त्यांना आरोग्यसेवा पुरवणा-या व्यक्तींना शरीरातील लक्षणांबाबत, व्यसने तसेच घरातील सदस्यांना झालेल्या फुफ्फुसाच्या कर्करोग याबाबतीत पुसटशीही कल्पना देत नाही. वाढत्या फुफ्फुसाच्या कर्करोगाच्या केसेस ध्यानात घेत याबाबतीत मोठ्या प्रमाणात जनजागृती आणि तपासणीबद्दल माहिती उपलब्ध व्हायला हवी. फुफ्फुसाच्या कर्करोगाचे निदान लवकर झाले तर उच्च जोखीमेच्या रुग्णांना वाचवणेही शक्य आहे.
डॉ जयलक्ष्मी टी के, सिनियर कन्सल्टन्ट पल्मोनॉलॉजी, अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबई म्हणाल्या, “अपोलो कॅन्सर सेंटरच्या लंग लाईफ स्क्रीनिंग प्रोग्रामची सुरुवात भारतामध्ये फुफ्फुसांच्या कॅन्सरमध्ये चिंताजनक वाढीवरील उपायांच्या दिशेने उचलण्यात आलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे. या सर्वसमावेशक स्क्रीनिंग प्रोग्रामसह आम्ही आजार लवकरात लवकर लक्षात यावा यावर लक्ष केंद्रित करत आहोत, त्यामुळे प्रभावी उपचार आणि रिकव्हरीची शक्यता खूप जास्त असते. या प्रोग्राममध्ये अत्याधुनिक लो-डोस सीटी स्कॅनचा उपयोग केला जातो, ज्यामुळे अचूक निदान केले जाते आणि रुग्णाच्या सुरक्षेला प्राधान्य दिले जाते. आम्ही सर्व एकत्र मिळून कॅन्सरवर उपचार करण्याबरोबरीनेच वेळेवर उपचार आणि प्रत्येक रुग्णाच्या गरजांनुसार तयार करण्यात आलेली सर्वसमावेशक देखभाल यांच्यामार्फत जीवनांमध्ये देखील परिवर्तन घडवून आणत आहोत.”
डॉ पवनकुमार बिरारीस, कन्सल्टन्ट पल्मोनॉलॉजी, अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबई यांनी सांगितले, “आज जगभरात सर्वात प्राणघातक कॅन्सर आहे फुफ्फुसांचा कॅन्सर, पण हा आजार लवकरात लवकर लक्षात आल्याने सर्व्हायव्हलची शक्यता वाढते. आमच्या लंग-लाईफ स्क्रीनिंग प्रोग्राममार्फत, लो-डोस सीटी टेक्नॉलॉजीचा उपयोग करून जास्त धोका असलेल्या लोकांना लवकरात लवकर ओळखणे आमचे उद्दिष्ट आहे. या तंत्रज्ञानामध्ये रेडिएशन एक्स्पोजर कमीत कमी असते आणि डायग्नोस्टिक प्रिसिजन वाढते. जे धूम्रपान करत होते, किंवा ज्यांना पॅसिव्ह स्मोकिंग करावे लागते किंवा कुटुंबात आधी कोणाला फुफ्फुसांचा कॅन्सर झाला आहे, अशा लोकांसाठी हा प्रोग्राम खूप प्रभावी आहे. फुफ्फुसांचा कॅन्सर उपचार करण्यायोग्य टप्प्यावर लक्षात आल्यास, आम्ही रुग्णांना उपचारांचे अधिक चांगले परिणाम मिळवून देऊन अधिक निरोगी भविष्यासाठी नवी आशा निर्माण करू शकतो.”
डॉ राजेश शिंदे, कन्सल्टन्ट एचपीबी, जीआय अँड थोरॅसिक ऑन्कोलॉजी आणि रोबोटिक सर्जरी अपोलो कॅन्सर सेंटर, नवी मुंबई, यांनी सांगितले, “लंग कॅन्सर एक सायलेंट धोका आहे, जास्तीत जास्त केसेसमध्ये हा आजार खूप पुढच्या टप्प्यामध्ये पोहोचल्यावर लक्षात येतो, आजारावर प्रभावी उपचार व्हावेत यासाठी तो लवकरात लवकर लक्षात येणे खूप आवश्यक आहे. लंग लाईफ स्क्रीनिंग प्रोग्राम सुरु करून अपोलो कॅन्सर सेंटर फुफ्फुसांच्या कॅन्सरच्या देखभालीप्रती दृष्टिकोनामध्ये क्रांती घडवून आणत आहे. या प्रोग्राममध्ये प्रिसिजन डायग्नोस्टिक आणि रुग्ण-केंद्रित देखभाल यांना एकत्र करून आजार लवकरात लवकर लक्षात येऊ शकतो, त्यामुळे रुग्ण बरा होण्याची शक्यता वाढते. कॅन्सरवरील उपचारांमध्ये उत्कृष्टतेची नवनवीन व्याख्या रचली जाण्याप्रती आमची बांधिलकी या उपक्रमामध्ये अधोरेखित करण्यात आली आहे.”
डॉ ज्योती बाजपेयी, लीड – मेडिकल अँड प्रिसिजन ऑन्कोलॉजी, अपोलो कॅन्सर सेंटर नवी मुंबई, यांनी सांगितले, “आम्ही भारतामध्ये पहिला लंग लाईफ स्क्रीनिंग प्रोग्राम सुरु केला ही आमच्यासाठी अतिशय अभिमानास्पद बाब आहे.