मुंबई :
महाराष्ट्रातील एक अत्यंत लोकप्रिय आणि जुनी परंपरा म्हणजे “रुखवत”, जी विशेषतः लग्नाच्या पारंपरिक रीतिरिवाजांसोबत जोडली गेली आहे. सुशीलकुमार अग्रवाल आणि अल्ट्रा मीडिया एंटरटेनमेंट ग्रुप द्वारे प्रस्तुत आणि राबरी एन्टरटेन्मेंटने द्वारे निर्मित हा चित्रपट १३ डिसेंबर २०२४ ला प्रदर्शित होणार असून, आज ४ डिसेंबर चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. सोबतच प्रेम, विरह, आणि ऋतूंच्या बदलत्या छटांची सुंदर अनुभूती देणारं ‘ऋतु प्रेमवेडा’ गाणं आणि लगीन समारंभांची पारंपारिक रोषणाई देणारं ‘लगीन सराई’ हे गाणं तुमच्या भेटीला आले असून हि दोनही गाणी ऐकताच प्रेक्षकांना एक अनोखा अनुभव मिळणार आहे. ट्रेलर आणि गाणी धमाल आहे म्हटल्यावर चित्रपट सुद्धा भारी असेल यात काही शंका नाही.
या चित्रपटाची सुरुवात पुरातत्वशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या तरुण विद्यार्थ्यांच्या ग्रुप ची आहे, जे शैक्षणिक सहलीसाठी एका विशाल आणि प्राचीन वाड्यात जातात. वाडा फिरत असताना संतोष जुवेकर आणि प्रियदर्शिनी इंडालकर यांना त्या ठिकाणी जुने रुखवत दिसते जवळ जाऊन पाहताच त्यांना त्यातील बाहुल्यांमधून बांगड्यांचे, हसण्याचे, आणि इतर गूढ आवाज ऐकू येतात. त्या वाड्याचा इतिहास काय आहे? त्यात मांडलेल्या रुखवतचे रहस्य काय? बाहुला बाहुलीचे आवाज ऐकू येण्यामागचे कारण नक्की काय ? वाड्यात फिरताना येणारे आवाज व होणारे भास या मागच कारण काय ? या सगळ्याचा उलगडा दोघे मिळून कसा करतात याची जुगलबंदी या चित्रपटामध्ये पहायला मिळेल.
या चित्रपटाची निर्मिती ब्रिंदा अग्रवाल यांनी केली असून उद्योजक म्हणून, त्यांनी नेहमीच मनोरंजन आणि संस्कृतीच्या क्षेत्रात नवकल्पकतेला प्रोत्साहन दिले आहे. त्यांचा दृषटिकोन आणि उत्पादनाची गुणवत्ता “रुखवत” मध्ये दिसून येईल. प्रसिद्ध दिग्दर्शक विक्रम प्रधान यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून आपल्या कथा आणि चित्रणाद्वारे दर्शकांना वेगवेगळ्या अनोख्या अनुभवांची वासना दिली आहे. “रुखवत” मध्ये त्यांनी सांस्कृतिक धारा आणि थ्रिलर कथानक यांचे सुंदर मिश्रण लोकांपुढे मांडण्याचा प्रयत्न केला आहे.