क्रीडा

अर्जुन मढवी स्मृती एकदिवसीय महिला क्रिकेट स्पर्धा – ग्लोरियसचा दणदणीत विजय

ठाणे :

ग्लोरियस क्रिकेट क्लबने दहिसर स्पोर्ट्स क्लबचा १३९ धावांनी दणदणीत पराभव करत डॉ राजेश मढवी स्पोर्ट्स असोसिएशन आणि दैवेज्ञ क्रिकेट क्लब आयोजित पाचव्या अर्जुन मढवी स्मृती एकदिवसीय महिला क्रिकेट स्पर्धेत आगेकूच केली. ग्लोरियस क्रिकेट क्लबने २१५ धावांचे आव्हान उभे केल्यावर प्रतिस्पर्ध्यांना ७६ धांवावर गुंडाळत विजयी सलामी दिली.

प्रथम फलंदाजी करताना साध्वी संजय आणि श्रद्धा शेट्टीने अर्धशतकी खेळी करत संघाच्या मोठया धावसंख्येचा पाया रचला. साध्वीने ७६ चेंडूत ७९ धावांची खेळी करत बारा वेळा चेंडू सीमापार पाठवला. श्रद्धाने ४७ चेंडूत आठ चौकार मारत ५० धावा केल्या. मुस्कान कनोजियाने तीन, शरण्या फडतेने दोन बळी मिळवले.
या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या दहिसर स्पोर्ट्स क्लबच्या फलंदाजांना ग्लोरियस क्रिकेट क्लबच्या चांगलेच जखडून ठेवले. प्रतिस्पर्धी फलंदाजांना झटपट बाद करताना ग्लोरियस क्रिकेट क्लबच्या वैष्णवी वर्मा आणि अक्षरा पिल्लईने प्रत्येकी तीन फलंदाज बाद केले. पराभूत संघाकडून समिया हुसैनने सर्वाधिक १६ आणि तन्वी गावडेने १४ धावा केल्या.

संक्षिप्त धावफलक :

ग्लोरियस क्रिकेट क्लब : ३६.३ षटकात सर्वबाद २१५ ( साध्वी संजय ७९,श्रध्दा शेट्टी ५०, मुस्कान कनोजिया ८-६४-३, शरण्या फडते ८-३५-२, प्रिया मिसाळ ७.३-३९-१, समिया हुसैन ६-१-२२-१, रुक्षा पटेल ३-१७-१, पर्णीका सैल १-७-१). विजयी

दहिसर स्पोर्ट्स क्लब : २६.४ षटकात सर्वबाद ७६ ( समिया हुसैन १६, तन्वी गावडे १४, वैष्णवी वर्मा ६-२४-३, अक्षरा पिल्लई ४-१६-३, तृष्णा नारकर ४-१-८-१,समृद्धी घारे ७-२-१७-१). सामन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडू – साध्वी संजय (ग्लोरियस क्रिकेट क्लब).

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *