शहर

कुंभमेळ्यानिमित्त विशेष रेल्वे गाड्या सोडण्याची खासदार संजय पाटील यांची मागणी

नवी दिल्ली : 

पुढील वर्षी जानेवारी ते फेब्रुवारी दरम्यान प्रयागराज या ठिकाणी कुंभमेळा होणार आहे. त्यानिमित्त मुंबईतील महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावरुन कुंभमेळ्याला जाणा-या भाविकांसाठी विशेष रेल्वे गाड्या चालविण्यात याव्यात अशी विनंती ईशान्य मुंबई महाविकास आघाडी शिवसेनेचे खासदार संजय दिना पाटील यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना एका पत्राव्दारे केली आहे.

पुढील वर्षी प्रयागराज या ठिकाणी कुंभमेळा होणार आहे. त्यानिमित्त मुंबईहून प्रयागराजला जाणा-या भाविकांसाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी), लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) व पनवेल या ठिकाणाहून विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात याव्यात. असे पत्रक ईशान्य मुंबई महाविकास आघाडी शिवसेनेचे खासदार संजय दिना पाटील यांनी एका पत्राव्दारे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना केली आहे.

कुंभमेळा हा जगातील सर्वात मोठा धार्मिक मेळावा आहे. या मेळाव्याला देश विदेशातून भाविक या ठिकाणी येत असतात. भाविकांची गर्दी लक्षात घेता, त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास न होता त्यांचा प्रवास आरामदायी, सुरक्षीत व्हावा यासाठी विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात याव्यात. तसेच या गाड्यांना अतिरिक्त डब्बे लावण्यात यावे, जास्त प्रवासी आरामदायी प्रवास करतील अशी व्यवस्था करावी. कुंभमेळ्याला येणा-या भाविकांची गर्दी पाहता प्रयागराज आणि मुंबईच्या रेल्वे स्थानकांवर गर्दीला आवरण्यासाठी योग्य नियोजन करावे. अशी विनंती खासदार संजय दिना पाटील यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *