शहर

रायगड किल्ला विकासासाठी उपसमिती गठीत करा – छत्रपती संभाजीराजे भोसले

नवी मुंबई : 

रायगड किल्ला संवर्धन व किल्ल्याच्या आजूबाजूचा परिसर पर्यटनाच्या दृष्टीने विकसीत करण्यासाठी शासनाद्वारे निधी मंजूर झाल्यानंतर आराखडा तयार करण्यात आला आहे. आराखडयातील कामांची अंदाजपत्रके तयार करुन निविदा प्रक्रीय पूर्ण झाली आहे. रायगड किल्ला व परिसर विकास पर्यटनाची कामे उत्तम दर्जाची आणि जलद गतीने होण्यासाठी उपसमिती गठीत करण्याच्या सूचना रायगड किल्ला व परिसर विकास पर्यटन आराखडा प्राधिकरणाचे अध्यक्ष छत्रपती संभाजी राजे भोसले दिल्या. छत्रपती संभाजी राजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली कोकणभवन येथील आयुक्त कार्यालयाच्या मुख्य दालनात आढावा बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते.

या बैठकीस कोकण विभागाचे महसूल आयुक्त डॉ.राजेश देशमुख, रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी किशन जावळे, उपआयुक्त(नियोजन) प्रमोद केंबावी, रायगडचे उपजिल्हाधिकारी डॉ.रविंद्र शेळके, महाडचे उपविभागीय अधिकारी ज्ञानोबा बानापूरे आदी अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत किल्ल्यांचा इतिहास जिवंत करुन दाखविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर करुन शिवसृष्टी निर्माण करण्यात येणार असल्याबाबतचे सादरीकरण करण्यात आले. पाचाड येथील राजमाता जिजाऊ समाधी व जिजामाता वाडा यांच्या संवर्धन व जिर्णोद्धाराचे कार्य तसेच याठिकाणी पर्यटकांसाठी आवश्यक सोयी उपलब्ध करून देण्यावर चर्चा करण्यात आली आहे.

रायगड किल्ला संवर्धन व किल्ल्याच्या आजूबाजूचा परिसर पर्यटनाच्या दृष्टीने विकसीत करण्यासाठी शासनाद्वारे निधी मंजूर झाल्यानंतर आराखडा तयार करण्यात आला आहे. आराखडयातील कामांची अंदाजपत्रके तयार करुन निविदा प्रक्रीय पूर्ण झाली आहे. रायगड किल्ला व परिसर विकास पर्यटनाची कामे उत्तम दर्जाची आणि जलद गतीने होण्यासाठी उपसमिती गठीत करण्याच्या सूचना रायगड किल्ला व परिसर विकास पर्यटन आराखडा प्राधिकरणाचे अध्यक्ष छत्रपती संभाजी राजे भोसले दिल्या. छत्रपती संभाजी राजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली कोकणभवन येथील आयुक्त कार्यालयाच्या मुख्य दालनात आढावा बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. किल्ल्यांचा इतिहास जिवंत करुन दाखविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर करुन शिवसृष्टी निर्माण करण्यात येणार असल्याबाबतचे सादरीकरण करण्यात आले. पाचाड येथील राजमाता जिजाऊ समाधी व जिजामाता वाडा यांच्या संवर्धन व जिर्णोद्धाराचे कार्य तसेच याठिकाणी पर्यटकांसाठी आवश्यक सोयी उपलब्ध करून देण्यावर चर्चा करण्यात आली आहे.

प्रगत संगणन विकास केंद्र (सीडॅक) व्दारे आधूनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन पर्यटकांच्या मार्गदर्शनासाठी विविध अ‍ॅप तयार करण्यात येणार आहेत. तसेच व्हिज्यूअल तंत्रज्ञानाचा वापर करुन पर्यटकांना गड-किल्ले आणि इतिहासातील माहिती देण्यासाठी विविध ठिकाणी दालने तयार करण्यात येणार आहेत. त्याचे सादरीकरण देखील करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *