शहर

प्रवाशांची सुरक्षितता हेच एसटीचे अंतिम ध्येय – भरत गोगावले

अपघात रोखण्यासाठी चालकांचे प्रशिक्षण , चालकाचे मानसि क आरोग्य आणि वाहनांची तांत्रिक निर्दोषत्व या त्रिसुत्रीवर काम करणार

मुंबई : 

दररोज ५५ लाख प्रवाशांना सुरक्षित सेवा देण्याच्या उददेशाने एसटी महामंडळ गेली ७६ वर्ष काम करीत असून रस्त्यावरील अपघात कमी करण्यासाठी चालकांचे सुयोग्य प्रशिक्षण, त्यांचे मानसिक आरोग्य सुदढ करणे या बरोबरच तांत्रिकदृष्ट्या निर्दोष बसेंस उपलब्ध करुन देणे या त्रिसुत्रीवर यापुढे भर देण्यात येत असून, प्रवाशांची सुरक्षितता हेच एसटीचे अंतिम ध्येय राहील असे प्रतिपादन एसटीचे अध्यक्ष आमदार भरत गोगावले यांनी केले.

भंडारा व नाशिक येथे झालेल्या एसटीच्या अपघाताबरोबरच नुकत्याच बेस्ट चालकाकडुन घडलेल्या अपघाताच्या पार्श्वभुमिवर अध्यक्ष गोगावले यांनी एसटी महामंडळाच्या वरिष्ठ ‍ अधिका-यांची बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये प्रवाशांना सुरक्षित प्रवास उपलब्ध करुन देण्याच्या उददेशाने चालक प्रशिक्षण , चालकांची निवड चाचणी, चालकाचे मानसिक आरोग्य याबरोबरच तांत्रिकदृष्ट्या निर्दोष वाहन उपलब्ध करुन देण्याबददल सखोल चर्चा करण्यात आली. सध्या एसटी महामंडळाच्या चालकांना अपघात होऊ नये यासाठी दर ६ महिन्याला उजळणी प्रशिक्षण दिले जाते. या प्रशिक्षणामध्ये चालकांच्या मानसि क आरोग्या बरोबरच त्यांचे बस चालवण्याचे कौश्‍ल्य विकसित करण्यावर भर दिला जातो. त्यानंतर प्रत्यक्ष वाहन चालन चाचणी घेऊन त्यांना पुनश्च सेवेमध्ये दाखल केले जाते. तसेच कर्तव्यावर असताना संबंधित चालकाने नशापान न करणे याचे काटेकोर पालन केले पाहिजे.हित पध्दत एसटीकडे कार्यरत असलेल्या खाजगी चालकांना देखिल वापरण्याच्या सुचना अध्यक्ष गोगावले यांनी एसटी प्रशासनाला दिल्या.

वेळेत बसेसचा पुरवठा न करण्या-या संस्थाना कारणे दाखवा नोटिसी पाठवा

सध्या एसटी महामंडळाकडे १४००० बसेस असून, उपलब्ध प्रवाशांसासाठी त्या अत्यंत अपु-या पडत आहेत. त्यापैकी अनेक बसेस अंत्यत जुन्या झाल्या आहेत. तसेच काही बसेस कालबाहय होण्याच्या उंबरठयावर आहेत. हि वसुस्थिती लक्षात घेता निवीदा पात्र संस्थानी नविन बसेस वेळेत पुरवठा करणे अत्यंत आवश्यक होते. तथापी, त्या संस्था बसेस पुरविण्या बद्दल सक्षम का नाहीत? याची शहानिशा करुन त्यांना कारणे दाखवा नोटिस पाठवुन दयावी असे निर्देश अध्यक्ष गोगावले यांनी एसटी प्रशासनाला दिले.

भाडेवाढीचा प्रस्ताव लवकरच शासनाला सादर करणार

कर्मचा-यांचे वाढते वेतन, इंधनाचा वाढता दर, टायर आणि सुटटया भागांची वाढती किंमत विचारात घेऊन सन २०२१ पासुन प्रंलबित असलेली एसटीची ‍तिकीट भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव लवकरच शासनाला सादर केला जाईल अशी माहिती अध्यक्ष श्री. भरत गोगावले यांनी दिली.
या वेळी एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर व एसटीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

ई बस प्रकल्पाला मी स्वतः पहिल्यापासून विरोध केला आहे. हा प्रकल्प चुकीच्या पद्धतीने राबविण्यात येत होता. कंपनीने वेळेत गाड्या पुरविल्या नाहीत. या शिवाय प्रती किलो मिटर २५ रुपयांचा तोटा एसटीला सहन करावा लागत आहे. ५१५० ई बस यायला १० वर्षे लागली असती. या प्रकल्पातील कंपनीशी करार करणाऱ्या संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी. नुसती नोटीस न देता कंपनी सोबतचा करार रद्द करून स्व मालकीच्या नवीन गाड्या घेण्यात याव्यात.
– श्रीरंग बरगे, सरचिटणीस, महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *