आरोग्य

हिवाळ्यामध्ये होमियोपथीच्या माध्यमातून प्रतिकारशक्तीची मजबूत करा – डॉ. मुकेश बत्रा

मुंबई :

सुखद गारव्याने भरलेली हवा आणि उबदारपणाची भावना घेऊन येणारा हिवाळा जादूई भासत असला तरीही बरेचदा तो आपल्यासोबत सर्दी, फ्लू आणि इतर मोसमी आजारांसह तब्येतीच्या कितीतरी समस्या घेऊन येतो. या काळामध्ये आपली रोगप्रतिकारशक्ती बळकट बनविणे हे या नेहमीच्या आजारांना दूर ठेवण्यासाठी अत्यावश्यक आहे. प्रबळ रोगप्रतिकारशक्ती बनवण्याचा एक प्रभावी आणि नैसर्गिक मार्ग म्हणजे होमियोपॅथी, औषधोपचारांची एक अशी पद्धती जी तुमच्या शरीराच्या संरक्षक यंत्रणेला उभारी देण्यासाठी सर्वांगीण पद्धतीने काम करते.

होमियोपॅथी ही शरीराच्या नैसर्गिक रोगशामक यंत्रणांना उत्तेजना देण्याच्या तत्त्वावर काम करते. बहुतेकदा केवळ लक्षणांवर भर देणाऱ्या पारंपरिक औषधोपचारांहून वेगळी असलेली होमियोपॅथी प्रत्येक व्यक्तीची विशिष्ट घडण आणि लक्षणे विचारात घेऊन उपचारांसाठी वैयक्तिकृत दृष्टिकोन बाळगते. यामुळे समस्येवर नेमकेपणाने लक्ष्य साधणारी अशी एक उपचारपद्धती अवलंबिण्यास वाव मिळतो, जी सौम्य तर असतेच पण दुष्परिणामांपासूनही मुक्त असते.

उदाहरणार्थ Arsenicum Album-30 हे एक सुप्रसिद्ध औषध आहे, ज्याचे रोगप्रतिकारशक्तीमध्ये सुधारणा घडवून आणणारे गुणधर्म दिसून आले आहेत व गुजरातमध्ये २०२० मध्ये कोव्हिड-१९ पॅनडेमिकदरम्यान प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून ३.४८ कोटींहून अधिक लोकांमध्ये या औषधाचे वितरण करण्यात आले. त्याचबरोबर सिलिका ही आणखी एक होमियोपॅथिक औषधी रोगप्रतिकारशक्ती बळकट करण्याच्या व हिवाळ्याशी संबंधित आजारांचा सामना करण्याच्या आपल्या क्षमतेसाठी प्रसिद्ध आहे.

भारत सरकारच्या आयुष मंत्रालयानेही आर्सेनिक आल्बम सारख्या होमियोपॅथिक औषधांच्या, रोगप्रतिकारशक्ती मजबूत करणाऱ्या गुणधर्मांसाठी त्यांचा पुरस्कार केला आहे. ही औषधे म्हणजे सुरक्षित आणि नैसर्गिक पद्धतीने दीर्घकाळ टिकणारी रोगप्रतिकारशक्ती पुरविण्याच्या बाबतीत होमियोपॅथीची कार्यक्षमता दर्शविणारी मूर्त उदाहरणे आहेत.

सर्दी आणि फ्लूसारखे हिवाळी आजार बरेचदा टाळता येत नाहीत, पण या आजारांसाठी प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक उपाययोजना म्हणून होमियोपॅथीचा उपयोग होऊ शकतो. शरीराला संसर्गांचा हल्ला होण्याआधीच तो परतवून लावण्यासाठी सुसज्ज बनविणे ही होमियोपॅथी औषधांची कार्यपद्धती आहे.

उदाहरणार्थ :

• ऑसिलोकॉस्सिम (Oscillococcinum) : हे औषध फ्लूच्या लक्षणांची तीव्रता कमी करण्यासाठी ओळखले जाते
• ॲल्लियम केपा (Allium Cepa) : नाक गळणे आणि शिंकांसह होणाऱ्या सर्दीवर गुणकारी
• ब्रायोनिया (Bryonia) : फ्लूमध्ये नेहमी होणारा कोरडा खोकला आणि अंगदुखीसाठी उपयुक्त
ही औषधे फक्त लक्षणे दूर करत नाहीत तर संसर्गांशी लढा देण्याची शरीराची एकूणच क्षमता अधिक बळकट बनवितात.

होमियोपॅथीचा आणखी एक आगळावेगळा पैलू म्हणजे या पद्धतीत वापरला जाणारा उपचारांचा वैयक्तिकृत दृष्टिकोन. ‘सर्वांसाठी एकच उपाय’ हे तत्व न अनुसरता होमियोपॅथीचे डॉक्टर्स प्रत्येक व्यक्तीची घडण, जीवनशैली आणि लक्षणे यांचे मूल्यमापन करून खास त्यांच्या गरजेनुसार बेतलेल्या औषधांची शिफारस करतात. यामुळे अधिक प्रभावी परिणाम मिळतात आणि आजार पुन्हा-पुन्हा डोके वर काढण्याच्या मूळाशी असलेल्या कारणांवर इलाज करतात.

युवाप्रौढ वयोगटातील व्यक्तींच्या बाबतीत ही औषधे उत्साहाची पातळी व चिवटपणा यांना बळकटी देण्यावर लक्ष करतात तर वयोवृद्धांसाठी दीर्घकालीन आजार किंवा कमकुवत झालेली रोगप्रतिकारशक्ती यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. होमियोपॅथिक औषधांची प्रत्येक रुग्णाच्या स्थितीनुसार दिलेल्या पोषण व जीवनशैलीशी निगडित सल्ल्यांशी सांगड घातल्यास रोगप्रतिकारशक्ती मजबूत बनविण्याची एक सर्वांगीण योजना यशस्वीपणे तयार करणे शक्य आहे.

जीवनशैलीशी निगडित नित्यक्रम फायदे वाढवितात :

१. पोषण : स्नायू आणि न्यूरॉन्सच्या कार्यक्षमतेसाठी आहारात सुकामेवा, बिया आणि हिरव्या पालेभाज्यांसारख्या मॅग्नेशियमने समृद्ध पदार्थांचा समावेश करा. त्याचबरोबर शहाळ्याचे पाणी किंवा शरीराची आर्द्रता भरून काढणाऱ्या पेयांद्वारे गमावलेल्या इलेक्ट्रोलाइट्सचे पुनर्भरण करा.
२. हायड्रेशन : शरीरातील विषतत्वे अर्थात टॉक्सिन्स बाहेर फेकण्यासाठी आणि शरीराला इष्टतम प्रमाणात कार्यरत ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या.
३. व्यायाम : मध्यम स्वरूपाच्या शारीरिक व्यायामामुळे रक्ताभिसरण अधिक चांगले होते व रोगप्रतिकारयंत्रणेच्या प्रतिसादक्षमतेत सुधारणा होते.
४. झोप : तुमच्या शरीराची झीज भरून काढण्यासाठी व त्याच्या संरक्षक यंत्रणांची पुनर्उभारणी करण्यासाठी किमान ७-८ तासांची निवांत झोप आवर्जून घ्या.
५. तज्ज्ञत्व: पुराव्यांवर आधारित, वैयक्तिकृत होमियोपॅथिक उपाययोजना पुरविण्याचा अनेक दशकांचा अनुभव
६. सर्वांगीण देखभाल: शरीराच्या रोगप्रतिकारशक्तीबरोबर मानसिक आणि भावनिक आरोग्याचाही समावेश असलेल्या सर्वांगीण स्वास्थ्यावर भर

सहज उपलब्धता: होमियोपॅथीची क्लिनिक्स आणि ऑनलाइन सल्लामसलतीची सुविधा देशभरात उपलब्ध असल्याने ही देखभाल मिळविण्याची सोय अगदीच हाताशी आहे. होमियोपॅथी उपचारपद्धती रोगप्रतिकारशक्तीच्या उभारणीचा व हिवाळी आजारांना प्रतिबंध करण्याचा एक सौम्य, नैसर्गिक आणि परिणामकारक मार्ग देऊ करते. या औषधोपचारांची सजगतेने निवडलेले जीवनशैलीच्या पर्यायांशी सांगड घालत तुम्ही मोसमी समस्यांचा सामना करणारी एक कणखर संरक्षक ढाल तयार करू शकता. तेव्हा, या हिवाळ्यामध्ये होमियोपॅथीला आरोग्य व प्रबलत्व वाढविण्याच्या दिशेने जाण्यासाठी तुमचे मार्गदर्शन करू द्या.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *