मुंबई :
वर्ष संपत आलं पण स्वप्नील जोशी जोरदार बॅक टू बॅक प्रोजेक्ट्स करताना दिसतोय. येणाऱ्या वर्षात स्वप्नील अनेक वेगवेगळ्या प्रोजेक्ट्स मध्ये मुख्य भूमिका साकारणार आहे आणि त्यातला एक सिनेमा म्हणजे सुशीला- सुजीत ! या चित्रपटात तो दुहेरी भूमिका साकारताना दिसणार असून चित्रपटाची निर्मिती आणि अभिनय अशी दुहेरी भूमिका तो करणार आहे. या चित्रपटाच्या घोषणे नंतर सोशल मीडिया वर अनेक चर्चा रंगल्या होत्या आणि आता प्रेक्षकांना एकदाची या चित्रपटाची रिलीज तारीख समजली आहे.
स्वप्नील ने सोशल मीडिया वरून सुशीला- सुजीत चित्रपटाची रिलीज डेट जाहीर केली असून १८ एप्रिल २०२५ रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सुशीला- सुजीत मध्ये स्वप्नील आणि सोनाली कुलकर्णी पहिल्यांदा एकत्र स्क्रीन स्पेस शेअर करणार आहेत.
सुशीला- सुजीत हा विषय नक्की काय आहे ? अजुन कोण कलाकार यात दिसणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे पण हा चित्रपट नक्कीच काहीतरी कमालीचा विषय घेऊन येईल यात शंका नाही ! वर्ष संपताना स्वप्नील आपल्या प्रेक्षकांना एका हून अधिक गूड न्यूज देताना दिसतोय आणि म्हणून या वर्षासारख २०२५ देखील त्याचासाठी खास ठरणार आहे.