मुंबई :
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात विद्यार्थ्यांना आपल्या आवडीनुसार शिक्षण मिळणार असून या धोरणात कौशल्य विकास व संशोधनावर भर असल्याने रोजगाराच्या संधी वाढणार असल्याचे प्रतिपादन भाजपचे प्रदेश कार्यकारिणी निमंत्रित सदस्य मुंबई मुख्याध्यापक उत्तर विभाग अध्यक्ष व शालेय शिक्षण विभागाच्या राज्य सल्लागार परिषदेचे सदस्य अनिल बोरनारे यांनी केले
मुंबईतील पवई येथील मिलिंद विद्यालयाच्या ३० व्या अभ्यास शिबिराचा सांगता समारंभ बोरनारे यांच्या हस्ते झाला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मिलिंद विद्यालयाचे संस्थापक संचालक सदानंद रावराणे, माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका रुपाली रावराणे प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका ए एस मुळेकर शाळेतील शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. शाळेत १४ दिवस चाललेल्या या शिबिरामध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सकाळी ७ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत लेखन व वाचन कौशल्य, प्रश्नपत्रिकांचा सराव व विविध विषयावरीत तज्ञानी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना अनिल बोरनारे पुढे म्हणाले की, आपल्या देशाला महासत्ता बनविणे हे या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे अंतिम उद्दिष्ट आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांचा कल पाहून विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार त्या विषयातील कौशल्य व संशोधन आधारित उच्च शिक्षण मिळेल यातून उद्योजक वाढून प्रत्येक विद्यार्थ्याला नोकरी मिळणार असल्याचे अनिल बोरनारे यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.
राज्य सल्लागार परिषदेवर निवड
राज्यातील शाळांमध्ये आरटीई कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी अनिल बोरनारे यांची राज्य शासनाने राईट टू एज्युकेशन कायद्याअंतर्गत “राज्य सल्लागार परिषदेवर” नियुक्ती केल्याने मिलिंद विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष सदानंद रावराणे यांनी त्यांच्या जय भवानी शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेच्या वतीने बोरनारे यांचा शाल श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार केला.