मुंबई :
महाराष्ट्र कॅरम असोसिएशन व मुंबई उपनगर जिल्हा कॅरम संघटनेच्या मान्यतेने दिनांक ११ ते १३ जानेवारी २०२५ दरम्यान घाटकोपर जॉली जिमखाना, वातानुकूलित हॉल, फातिमा शाळे समोर, विद्याविहार ( पश्चिम ), मुंबई – ४०००८६ येथे दुसऱ्या घाटकोपर जॉली जिमखाना राज्य मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
पुरुष एकेरी आणि महिला एकेरी अशा दोन गटात हि स्पर्धा खेळविण्यात येणार आहे. शिवाय प्रत्येक गटातील पहिल्या ८ विजेत्यांना मिळून एकंदर १ लाख १० हजारांची रोख पारितोषिके तसेच विजेत्या व उपविजेत्यांना चषक देण्यात येणार आहेत. स्पर्धेचे प्रवेश अर्ज महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या www.maharashtracarromassociation.com या संकेत स्थळावर उपलब्ध आहेत. स्पर्धेत भाग घेण्यासाठी खेळाडूंनी आपली नावे आपल्या जिल्हा संघटनेमार्फत दिनांक २ जानेवारी २०२५ पर्यंत महाराष्ट्र कॅरम असोसिएशनकडे नोंदवावी. स्पर्धेचा ड्रॉ दिनांक ८ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी भ्रमणध्वनी क्रमांक ९९८७०४५४२९ येथे संपर्क साधावा.