शहर

बाबू आर.एन. सिंह यांच्या जयंतीनिमित्त दिव्यांगांना स्वरोजगारासाठी मोफत आटा चक्की वितरित

मुंबई : 

उत्तर भारतीय संघ भवनाचे स्वप्न साकार करणारे, आधुनिक उत्तर भारतीय संघाचे निर्माते, माजी भाजप आमदार आणि उत्तर भारतीय संघाचे माजी अध्यक्ष बाबू आर.एन. सिंह यांच्या ७७ व्या जयंतीनिमित्त श्रद्धांजली कार्यक्रमादरम्यान, समाजकल्याणाच्या अनुषंगाने १५ दिव्यांग व्यक्तींना स्वरोजगारासाठी मोफत आटा चक्क्या (घरघंटी) वितरित करण्यात आल्या.

हा कार्यक्रम मुंबईच्या बांद्रा पूर्व येथील उत्तर भारतीय संघ भवनात संपन्न झाला. या प्रसंगी उत्तर भारतीय समाजाच्या वतीने बाबू आर.एन. सिंह यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आणि समाजासाठी त्यांच्या अमूल्य योगदानाला उजाळा देण्यात आला. आर.एन. सिंह यांचे स्वप्न त्यांचे पुत्र संतोष सिंह पूर्ण करत आहेत. मुंबई आणि परिसरात राहणाऱ्या उत्तर भारतीयांसाठी आर.एन. सिंह यांनी उत्तर भारतीय संघ भवनाची स्थापना केली आणि अनेकांचे स्वप्न साकार केले. त्यांच्या नेतृत्वाखाली उत्तर भारतीय संघाने उत्तर भारतातून येणाऱ्या तीर्थयात्रेकरू आणि कॅन्सरग्रस्त रुग्णांच्या नातेवाईकांसाठी 7 हजार चौरस फुटांमध्ये बाबू आर.एन. सिंह अतिथीगृह उभारले आहे. या अतिथीगृहात प्रवाशांसाठी ५० बेडची डॉर्मिटरी आणि ५ एसी रूम्स उपलब्ध आहेत. महिलांसाठी स्वतंत्र डॉर्मिटरीची सोय असून कॅंटीनची सुविधा देखील आहे. या उपक्रमामुळे गरजूंना मोठ्या प्रमाणात मदत मिळत आहे.
बाबू आर.एन. सिंह यांच्या योगदानाने उत्तर भारतीय समाजाला नवी दिशा मिळाली असून, त्यांचे कार्य प्रेरणादायी असल्याचे वक्त्यांनी यावेळी नमूद केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *