गुन्हे

ऑनलाईन ज्युस पाकीट मागविणाऱ्या व्यावसायिकाची फसवणूक

भाईंदर :

मिरा भाईंदर मध्ये कॅटरिंगचा व्यवसाय करणारे व्यावसायिक यांनी आँनलाईन ज्युस पॉकेटची ऑर्डर दिली होती. त्यासाठी त्यांनी आँनलाईन ५७ हजार ६०० रूपये पाठवले परंतु पैसे पाठवल्यानंतर ज्युसचे पॉकेट मिळाले नसल्याने त्यांची फसवणुक करण्यात आली आहे. याप्रकरणी उत्तन सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भाईंदर पश्चिमेच्या उत्तन परिसरात राहणारे राजेंद्र अधिकारी (६३) हे मिरा भाईंदर मध्ये कॅटरिंग व्यवसाय करतात. त्यांना त्यांच्या ऑर्डरसाठी पाच प्रकारचे ज्युस पाहिजे होते. ते मिरा भाईंदर मध्ये ऊपलब्ध नसल्यामुळे त्यांच्या सुनेने गुगल वर इंडिया मार्ट वर आँनलाईन सर्च केले. त्यानंतर त्यांना डिस्ट्रीब्युटर या कंपनीतुन फोन आला, तुम्हाला ज्यूस ची गरज आहे का, अशी विचारणा केली. तसेच त्यांचे कडे ज्युस उपलब्ध आहेत असे सांगितले. त्यानंतर त्यांनी आँनलाईन ६० बॉक्स ची ऑर्डर दिली. त्यासाठी ५७ हजार ६०० रूपये आँनलाईन भरले. पैसे ऑनलाईन पाठवल्यानंतर त्याला याबाबत मोबाईलवरुन कळविले.

तसेच त्याचेकडे सदर ज्युसची डिलीव्हरी केव्हा मिळेल असे विचारले असता त्यांनी तक्रारदार यांना उ‌द्या पाठवतो, असे सांगितले. त्यांनतर काही वेळानंतर त्या व्यक्ती फोन केला असता तो फोन बंद आढळून आले. त्यानंतर वारंवार त्या इसमांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न केले, परंतु त्या व्यक्तीशी संपर्क होवू शकला नाही. त्या इसमाने ज्यूस देण्याच्या बहाण्याने ऑनलाईन ५७ हजार ६०० रूपये अशी रक्कम घेवून तसेच ज्युसची ऑर्डर पूर्ण न करता त्यांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी अनोळखी व्यक्ती विरोधात उत्तन सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत कडळकर हे करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *