मुंबई :
घाटकोपर जॉली जिमखाना येथे महाराष्ट्र कॅरम असोसिएशन व मुंबई उपनगर जिल्हा कॅरम संघटनेच्या मान्यतेने आयोजित करण्यात आलेल्या दुसऱ्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत पुरुष एकेरी गटात पुण्याच्या अनिल मुंढे तर महिला एकेरी गटात ठाण्याच्या मधुरा देवळेला प्रथम मानांकन देण्यात आले आहे.
११ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ठीक ९ वाजता पुरुष एकेरी गटाने स्पर्धेला सुरुवात होईल. पुरुष एकेरी गटात ३३६ तर महिला एकेरी गटात ५० खेळाडूंनी भाग घेतला आहे. स्पर्धेतील महत्वाच्या सामन्यांचे थेट प्रसारण महाराष्ट्र कॅरम असोसिशनच्या युट्युब चॅनलवरून करण्यात येणार आहे. स्पर्धेतील मानांकन पुढील प्रमाणे.
पुरुष एकेरी : १) अनिल मुंढे (पुणे), २) रिझवान शेख (मुंबई उपनगर), ३) योगेश परदेशी (पुणे), ४) विकास धारिया (मुंबई), ५) सागर वाघमारे (पुणे), ६) झैद अहमद फारुकी (ठाणे), ७) संजय मांडे (मुंबई), ८) पंकज पवार (ठाणे)
महिला एकेरी : १) मधुरा देवळे (ठाणे), २) समृद्धी घाडीगावकर (ठाणे), ३) दीक्षा चव्हाण (सिंधुदुर्ग), ४) केशर निर्गुण (सिंधुदुर्ग), ५) प्राजक्ता नारायणकर (मुंबई उपनगर), ६) रिंकी कुमारी (मुंबई), ७) अंजली सिरीपुरम (मुंबई), ८) आकांक्षा कदम (रत्नागिरी)