शहर

जयंतीनिमित्त राष्ट्र पुरुष आणि थोर व्यक्तींचा इतिहास उलगडणार

शाळा, कॉलेजात अंमलबजावणी बंधनकारक

मुंबई : 

देशाच्या इतिहासात राष्ट्र पुरुष थोर महापुरुषांचे मोठे योगदान आहे. त्यामुळे राष्ट्र पुरुष थोर व्यक्तींची जयंती साजरी करताना प्रदर्शनीय भागात त्यांचे फलक झळकवा, असे परिपत्रक राज्य सरकारने शुक्रवारी जारी केले आहे. दरम्यान, मंत्रालय, शासकीय कार्यालये महाविद्यालय शाळा यांनाही यापुढे राष्ट्र पुरुष थोर व्यक्तींचा इतिहास उलगडावा यासाठी प्रदर्शनीय भागात त्यांचे फलक झळकवा, असा शासन निर्णय शुक्रवारी जारी करण्यात आला आहे.

महाराष्ट्र शासनातर्फे मंत्रालयात, राज्यातील सर्व शासकीय कार्यालयात आणि प्रशासकीय मुख्यालयात थोर महापुरुषांची जयंती साजरी केली जाते. या कार्यक्रमांच्या वेळी सर्वसामान्य जनतेस महापुरुषांच्या कार्याची माहिती मिळावी यासाठी शासनाने थोर महापुरुषांची जयंती असताना त्यांच्या प्रतिमेसह जीवन कार्याबाबत माहिती देणारे फलकही लावण्याचा निर्णय शासनाने घेतल्याची माहिती कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली. शुक्रवारी याबाबत शासन निर्णयही जारी करण्यात आला आहे. महापुरुषांच्या जयंतीनिमित्त मंत्रालय, सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालये, शाळा व महाविद्यालये येथे त्यांच्या प्रतिमेसह जीवन चरित्राची माहिती देणारे फलकही लावण्यात येतील. तसेच ‘जयंती फलक या शीर्षकाखाली https://gad.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर सदर माहिती उपलब्ध करून दिली जाणार आहे.

त्या पत्राची दखल

या मागणीसाठी राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी यासंदर्भात मुख्य सचिव सुजाता सौनिक यांना पत्र लिहले होते. गेल्यावर्षी हे पत्र लिहताना राज्याच्या सर्व शासकीय कार्यालयात या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची मागणी लोढा यांनी या पत्रात केली होती अखेर ती मागणी मान्य करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *