मुंबई :
खो-खो फेडरेशन ऑफ इंडिया द्वारे आयोजित “खो-खो विश्वचषक-2025” या स्पर्धेच्या प्रायोजकत्वासाठी “विशेष बाब” म्हणून दहा कोटी इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या निर्देशानुसार याबाबतचा शासन निर्णय निर्गमित झाला आहे.
खो-खो फेडरेशन ऑफ इंडियाद्वारे १३ ते १९ जानेवारी, २०२५ या कालावधीत आयोजित ‘खो-खो विश्वचषक-२०२५‘ या स्पर्धेच्या प्रायोजकत्वासाठी हा निधी मंजूर केला आहे. यामुळे ‘खो-खो” खेळाला पाठबळ मिळाले आहे. खेळाडूंमध्ये समाधानाचे वातावरण आहे. विशेष बाब म्हणून तातडीने शासन निर्णय निर्गमित केला असल्याने “खो-खो” खेळाला पाठबळ मिळाले आहे.
खो-खो फेडरेशन ऑफ इंडिया द्वारे आयोजित “खो-खो विश्वचषक-2025” या स्पर्धेच्या प्रायोजकत्वासाठी “विशेष बाब” म्हणून दहा कोटी इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या निर्देशानुसार याबाबतचा शासन निर्णय निर्गमित झाला आहे.
दिल्लीत खो-खोचा कुंभमेळा
राजकीत वाटचालीत अनेक दिग्गज नेते एकमेकांना खो देत आपले राजकारण साधत असतात पण त्याच राजकीय राजधानीत खो-खो पहायला व तो आवाज ऐकायला क्रीडा रसिकांना मात्र स्वर्गीय आनंद मिळणार आहे. पहिल्या वहिल्या खो-खो विश्वचषकासाठी जगभरातून संघ दाखल झाले असले तरी खरा आनंद खो-खो क्रीडा कार्यकर्त्यांच्या तोंडावर भरभरून वाहताना दिसतोय. इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियम या ऐतिहासिक स्पर्धेचे साक्षीदार होणार आहे, जिथे भारतीय परंपरेतून उगम पावलेल्या या खेळाचा जागतिक व्यासपीठावर एक नवीन अध्याय सुरू होणार आहे.