मुंबई :
रात्रशाळांमुळे शिक्षणापासून वंचित असलेल्या अनेक मुलांच्या आयुष्याला गती मिळाली असून ही मुले विविध क्षेत्रात प्रगतीच्या शिखरावर असल्याचे प्रतिपादन भाजपा प्रदेश कार्यकारिणी निमंत्रित सदस्य व मुंबई मुख्याध्यापक संघ उत्तर विभाग अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी केले.
चेंबूरमधील चेंबूर एज्युकेशन सोसायटीच्या चेंबूर नाईट हायस्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलन आणि वार्षिक वितरण सोहळा शाळेच्या डॉ केशव बळीराम हेडगेवार सभागृहात संपन्न झाला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोरनारे बोलत होते. संस्थेचे प्रधान कार्यवाह जितेंद्र म्हात्रे शालेय समिती अध्यक्षा भूषणा पाठारे कोषाध्यक्ष चेतना कोरगावकर मासूम संस्थेचे विभाग प्रमुख शशिकांत गवस वीरेंद्र बोने बालरक्षक रामराव पवार शाळेचे मुख्याध्यापक संतोष धावडे जनकल्याण समितीच्या शुभांगी गुजर आदी उपस्थित होते.
अनिल बोरनारे पुढे म्हणाले की दिवसभर नोकरी करून रात्री शिक्षण घेण्याची संधी रात्रशाळेमुळे गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मिळते. रात्रशाळेमुळे कष्टकरी विद्यार्थ्यांचे जीवनच बदलून टाकले आहे.पूर्ण वेळ शाळेत शिकविणे सोपे असते मात्र रात्रशाळेतील विद्यार्थ्यांना कमी वेळात संपूर्ण अभ्यासक्रम शिकविण्याचं कौशल्य रात्रशाळा शिक्षकांकडे असून त्यांचे खऱ्या अर्थाने कौतुक आहे. कोणताही व्यावसायिक दृष्टिकोन न ठेवता केवळ सामाजिक बांधिलकीतून रात्रशाळा चालवीणाऱ्या मुंबईतील संस्थाचालकांचे देखील बोरनारे यांनी कौतुक केले.
रात्रशाळा शिक्षक, विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी, मुख्याध्यापक व संस्थाचालक यांचे प्रश्न शासन दरबारी मांडून मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार असल्याचे बोरनारे यांनी आपल्या भाषणात सांगितले. वर्षभरात घेतलेल्या विविध उपक्रम स्पर्धामध्ये यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक अरुणा कांबळे रुपाली कांबळे हरिदास भांबेरे दीपक कोणनूर वसंत मानवर तसेच लिपिक वैशाली दुरे यांनी मेहनत घेतली