नवी दिल्ली :
नवी दिल्ली येथे १३ ते १९ जानेवारी दरम्यान होणाऱ्या पहिल्या विश्वचषक खो-खो स्पर्धेसाठी खो-खोचा ग्रामीण ते जागतिक स्तरापर्यंत डिजिटल, सोशल मीडिया व वृत्तपत्राच्या माध्यमातून प्रचार-प्रसार आणि प्रसिद्धीसाठी महाराष्ट्र खो खो असोसिएशनच्या तिघांची निवड झाली आहे. महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे सहसचिव बाळासाहेब (बाळ) तोरसकर (मुंबई), प्रसिद्धी समितीचे चेअरमन अजितकुमार संगवे (सोलापूर) व सदस्य भूषण कदम (पुणे) यांचा यात समावेश आहे.
त्यांच्या निवडीबद्दल महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, सरचिटणीस प्रा. डॉ. चंद्रजीत जाधव, कार्याध्यक्ष सचिन गोडबोले, खजिनदार ॲड. गोविंद शर्मा यांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.
बाळासाहेब शिवाजी तोरसकर (सहसचिव) :
खेळ आणि समाजकार्य यांचा सुरेख संगम साधत खो-खोच्या क्षेत्रात आपले स्थान अधोरेखित केले. राष्ट्रीय खो-खो पंच. महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या प्रसिद्धी समितीचे चेअरमन म्हणून कार्य. मुंबई खो-खो संघटना उपाध्यक्ष. मुंबई व महाराष्ट्रात खो-खोच्या प्रसिद्धीसाठी महत्वाची भूमिका. वेगवेगळ्या वर्तमानपत्रात खेळासाठी विविध लेख प्रसिद्धी. मुंबईत झालेल्या एकमेव राष्ट्रीय खो-खो स्पर्धेचे संयोजन सचिव.
अजितकुमार बापूराव संगवे (प्रसिद्धी समिती चेअरमन) :
पत्रकार. राष्ट्रीय सुवर्णपदक विजेते खो-खोपटू. राष्ट्रीय खो-खो पंच. राष्ट्रीय सुवर्णपदक विजेत्या किशोरी खो-खो संघाचे प्रशिक्षक. महाराष्ट्र खो-खो असोसिएशन प्रसिद्धी समितीचे सदस्य व सचिव म्हणून कार्य. सोलापूर खो-खो असोसिएशनचे सरचिटणीस. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे अधिसभा सदस्य. महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघाचे प्रसिद्धी समितीप्रमुख.
भूषण प्रकाश कदम (प्रसिद्धी समिती सदस्य ) :
प्रवर्तक म्हणून निवड, फोटोग्राफर, १२ वर्षे खेळ आणि महाराष्ट्र खो-खो असोसिएशनकरिता खेळाचा प्रचार प्रसार प्रवर्तक म्हणून काम. माजी प्रसिद्धी समिती सचिव, महाराष्ट्र खो-खो असोसिएशन. पुणे जिल्हा खो-खो असोसिएशन व महाराष्ट्र खो-खो असोसिएशन कुमार/कुमारी गटाकरिता निवड समिती सदस्य म्हणून काम. मुक-बधिर विद्यार्थ्यांना खो-खो प्रशिक्षण देऊन खेळाची आवड निर्माण करण्याचे कार्य केले. गरजू ग्रामीण भागातील खेळाडूना खो-खोचे मार्गदर्शन.