आरोग्य

ग्लेनईगल्स हॉस्पिटलमध्ये डॉमिनो किडनी प्रत्यारोपणाने वाचविले तिघांचे प्राण

मुंबई : 

परळ येथील ग्लेनईगल्स हॉस्पिटलमध्ये २०२५ मधील पहिले डोमिनो किडनी प्रत्यारोपण यशस्वीरित्या पार पडले. डॉ. भरत शाह, डॉ. श्रुती तापियावाला ,डॉ. प्रदीप राव, डॉ. जितेंद्र जगताप आणि यांच्या नेतृत्वाखाली या सहा शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून यात नातेसंबंध नसलेले तीन दाते आणि तीन रुग्णांचा समावेश होता. जवळचे नातेवाईक मूत्रपिंड दान करू इच्छित असले तरी रक्तगट व किडनी ‘मॅच’ होत नाही मात्र परंतु दुसऱ्या रुग्णाच्या नातेवाईकांचे हे दोन्ही मॅच होते अशा प्रकरणात ‘डॅामिनो ट्रान्सप्लान्ट’केले जाते. या पद्धतीमुळे अवयव मिळाल्यास मागणी आणि पुरवठ्यामधील अंतर कमी होण्याची शक्यता आहे.

कोणत्याही अवयवाच्या प्रत्यारोपणासाठी रक्तगट व रक्तपेशी जुळणे गरजेचे असते. मात्र तसे होत नसेल तर रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी डॉमिनो हाच पर्याय उरतो. ही क्रमबद्ध शस्त्रक्रिया आहे. डॉमिनो प्रत्यारोपणामध्ये दोनपेक्षा जास्त कुटुंबांचा समावेश असतो जे मानवी साखळी तयार करतात, ज्यामध्ये सुसंगत जुळणीसाठी देणगीदारांची प्राप्तकर्त्यांसोबत अदलाबदल केली जाते. लोकसंख्येच्या केवळ ७-१०% रुग्णांना अशा प्रकारच्या प्रत्यारोपणाची गरज भासते.

या प्रक्रियेत तीन रुग्णालय आणि शहरांमध्ये सहा शस्त्रक्रिया करण्यात आल्या, ज्यामुळे तीन दाते आणि तीन प्राप्तकर्त्यांची एक साखळी तयार करण्यात आली. यात एका जोडीतील दाता दुस-या जोडीतील रुग्णाला आपली किडनी देतो. सर्वात आधी शेवटचा दाता पहिल्या रुग्णाला आपली किडनी देतो.प्रगत इम्युनोसप्रेशन आणि डिसेन्सिटायझेशन तंत्रांचा वापर करून, डोमिनो प्रत्यारोपण यशस्वीरित्या पार पडले

ग्लेनईगल्स हॉस्पिटलमधील रेनल सायन्सचे संचालक डॉ. भरत शाह सांगतात की, ही यशस्वी शस्त्रक्रिया उत्तम टीमवर्क, अचूकता आणि नाविन्यपूर्णतेचे उत्तम उदाहरण ठरले आहे. अवयवाच्या प्रत्यारोपणासाठी रक्तगट व रक्तपेशी जुळत नसलेल्या रुग्णांसाठी डॉमिनो प्रत्यारोपणाचा पर्याय वरदान ठरला आहे.

नेफ्रोलॉजिस्ट डॉ. श्रुती तापियावाला यांनी अधोरेखित केले की, पूर्वी प्रत्यारोपण, गर्भधारणा किंवा रक्त संक्रमणामुळे संवेदनशील रुग्णांना सुसंगत दाते शोधण्यात प्रचंड अडचणी येत होत्या. प्रत्यारोपण करू इच्छिणाऱ्या लोकसंख्येपैकी सुमारे ७ ते १० % लोक अत्यंत संवेदनशील असतात, अँटीबॉडीजमुळे नकाराचा(rejection) धोका ३० ते ३५ टक्क्यांपर्यंत वाढतो. या अडथळ्यांवर मात करण्यासाठी डिसेन्सिटायझेशन आणि डोमिनो ट्रान्सप्लांट सारखे प्रगत तंत्र महत्त्वाचे ठरत आहे.

प्रत्यारोपणासाठी यांचा सहभाग

१) हैदराबादमधील एका ५५ वर्षीय महिला जिला अनेक दात्यांच्या विशिष्ट अँटीबॉडीज होत्या, तिला तिचा पती, तिची भाऊ, काकू आणि मामासह सर्व नातेवाईकांकडून अचुक जुळवणी होत नव्हती.

२) एका १७ वर्षीय मुलगा, ज्याचे पहिले प्रत्यारोपण कोविड-१९ महामारी काळात झाले. त्याच्या काकू आणि वडिलांविरुद्ध अँटीबॉडीजमुळे त्याला त्यांच्याकडून मूत्रपिंड घेता आले नाही रुग्णास त्याच्या आधीच्या प्रत्यारोपणातील संवेदनशीलता दूर करण्यासाठी विशेष खबरदारी घेणे गरजेचे होते.

३) १७ वर्षाच्या एका तरुण मुलीचे भूतकाळातील संसर्गामुळे मूत्रपिंड निकामी झाले होते आणि जन्मजात विकृतींमुळे तिला अतिरिक्त आव्हानांना तोंड द्यावे लागत होते.काही महिने असलेली एचएलए (मानवी ल्युकोसाइट अँटीजेन) जुळणी, क्रॉस-मॅचिंग आणि व्यापक समुपदेशनामुळे ही जीवन वाचवणारी प्रक्रिया १९ डिसेंबर रोजी यशस्वीरित्या पार पडली. प्राप्तकर्त्यांवर जवळपास १८ तास सुरु असलेल्या प्रत्यारोपण शस्त्रक्रियेला अखेर यश मिळाले.

डॉ. प्रदीप राव(संचालक – युरोलॉजिस्ट आणि किडनी ट्रान्सप्लांट) सांगतात की, संवेदनशील रुग्णांसाठी मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी अनेकदा पारंपारिक दाता-रुग्ण जुळणीपलीकडे विशेष उपचारांची आवश्यकता भासते. डॉमिनो ट्रान्सप्लांट, जरी भारतात कायदेशीर आणि धोरणात्मकदृष्ट्या आव्हानात्मक असले तरी, अशा प्रकरणांमध्ये ते गेम-चेंजर ठरते. या पर्यायांशिवाय, बरेच रुग्ण अनिश्चित काळासाठी डायलिसिसवर अवलंबून राहतात

वर्षानुवर्षे वाट पाहिल्यानंतर आणि कित्येक अयशस्वी प्रयत्नांनंतर, मला अखेर आशेचा किरण यासाठी सहकार्य करणाऱ्या डॉ. श्रुती तापियावाला आणि माझ्या नेफ्रोलॉजिस्ट डॉ. अनुराधा यांच्या यांचे मी मनापासून आभार मानते.मला नवे आयुष्य मिळवून देण्याऱ्या दात्यांचेही खरोखर कौतुक आहे अशी प्रतिक्रिया हैदरा हा द येथील रुग्णाने व्यक्त केली.

मुंबईतील परळ येथील ग्लेनईगल्स हॉस्पिटल्सचे सीईओ डॉ. बिपिन चेवाले सांगतात की, हे यशस्वी डॉमिनो ट्रान्सप्लांट हे वैद्यकीय शास्त्रातील प्रगतीचे उत्तम उदाहरण ठरले आहे. ग्लेनईगल्स हॉस्पिटल्सच्या माध्यमातून मर्यादित पर्याय उपलब्ध असलेल्या रुग्णांना जगण्याची नवी आशा आणि यशस्वी उपचार पुरविण्या सर्वतोपरी प्रयत्न केला जातो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *