क्रीडा

राज्य कॅरम स्पर्धेत विश्व विजेत्या प्रशांत – संदीपची उपांत्य फेरीत धडक

मुंबई : 

घाटकोपर जॉली जिमखानाच्यावतीने आयोजित केलेल्या दुसऱ्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत मुंबईच्या माजी विश्व विजेत्या प्रशांत मोरेने ठाण्याच्या पंकज पवारला २५-११, २५-१ असे सहज पराभूत करून उपांत्य फेरी गाठली.

दुसरीकडे मुंबई उपनगरच्या विश्व विजेत्या संदीप दिवेने रंगातदार लढतीत मुंबईच्या विकास धारियाला २५-०, १६-२५ व २५-१ असे नमवून उपांत्य फेरीतील आपले स्थान निश्चित केले. महिलांमध्ये उप उपांत्य लढतीत रत्नागिरीच्या आकांक्षा कदमने तीन सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत ठाण्याच्या समृद्धी घाडीगावकरवर २०-७, १७-२२, १९-१८ असा विजय मिळविला. तर मुंबईच्या रिंकी कुमारीने मुंबईच्या अनुभवी संगीता चांदोरकरला ११-२५, २३-११, २-८ असे हरवून उपांत्य फेरीत प्रवेश केला.

पुरुष एकेरी उपउपांत्य फेरीचे इतर निकाल

  • महम्मद घुफ्रान ( मुंबई ) वि वि सागर वाघमारे ( पुणे ) २५-१३, ९-२२, २०-१४
  • राहुल सोळंकी ( मुंबई ) वि वि सिद्धांत वाडवलकर ( मुंबई ) ९-२५, २५-२३, २५-१६

महिला एकेरी उपउपांत्य फेरीचे निकाल 

  • मिताली पाठक ( मुंबई ) वि वि अंबिका हरिथ ( मुंबई ) २३-१५, २०-१०
  • प्राजक्ता नारायणकर ( मुंबई उपनगर ) वि वि मधुरा देवळे ( ठाणे ) २५-१४, २५-६

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *