गुन्हे

डिलिव्हरी बॉइजचा कारनामा; कारवाई टाळण्यासाठी नंबर प्लेटवर स्टीकर

कल्याण :

कल्याणमध्ये डिलिव्हरी बॉइजचा अनोखा कारनामा पहायला मिळाला असून लवकर डिलव्हरी पोहचविण्यासाठी वाहतूक नियमांचे उल्लंघन या डिलिव्हरी बॉइजकडून केले जात आहे. कारवाई टाळण्यासाठी आपल्या दुचाकीच्या नंबर प्लेटवर स्टीकर लावतात. याकडे आरटीओ आणि वाहतूक विभागाचे दुर्लक्ष होत असून हा सर्व प्रकार मनसेचे शाखा अध्यक्ष नीलेश जगदाळे यांनी व्हीडीओच्या माध्यमातून उघडकीस आणला आहे.

वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यानंतर येणारे चलन आणि होणारी कारवाई टाळण्यासाठी कल्याणमध्ये अनेक डिलिव्हरी बॉइजने अनोखी शक्कल लढवली आहे. कमी वेळेत डिलिव्हरी करण्यासाठी सिग्नल तोडून, वाहतूक नियमांचे उल्लंघन करून हे डिलिव्हरी बॉइज काम करत असतात. मात्र हे करतांना शहरातील सिग्नलवर लावलेल्या सिसिटीव्ही कॅमेराच्या माध्यमातून कारवाई होऊन चलन येऊ नये किंवा पोलिसांची कारवाई टाळण्यासाठी हे डिलिव्हरी बॉइज आपल्या गाडीच्या नंबरप्लेटवरील एका नंबरला स्टीकर लावून फिरत आहेत. हा सर्व प्रकार मनसेचे शाखा अध्यक्ष नीलेश जगदाळे यांनी समोर आणला आहे. सोशल मिडियावर व्हीडीओ बनवत त्यांनी ही पोलखोल केली आहे.

कल्याणमध्ये विविध कंपन्यांचे डिलिव्हरी बॉय डिलिव्हरी करण्यासाठी दुचाकी वापरतात. मात्र लवकरात लवकर डिलिव्हरी करण्यासाठी वाहतूक नियमांचे उल्लंघन करतात. हे करतांना आपल्या दुचाकीचा नंबर लपवतात जेणे करून त्यांच्यावर चलान किंवा कोणतीही कारवाई होऊ नये यासाठी करतात. एवढेच नव्हे तर हे ज्या ठिकाणी अथवा सोसायटी मध्ये डिलिव्हरी करतात त्याठिकाणी यांच्याकडून काही अप्रिय घटना घडल्यास याला जवाबदार कोण असा सवाल निलेश जगदाळे यांनी केला आहे.

तर या सर्व प्रकाराकडे आरटीओ आणि वाहतूक विभागाचे पूर्णतः दुर्लक्ष होत असून याबाबत वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेश शिरसाठ यांना विचारले असता हि बाब एका तरुणाने निदर्शनास आणून दिली असून कल्याण मधील 10 पॉइंटवर डिलिव्हरी बॉइजच्या गाड्यांची तपासणी करण्याच्या सूचना वाहतूक पोलिसांना केल्या असल्याचे त्यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *