नाशिक :
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या हिवाळी सत्र-2024 च्या तिसऱ्या टप्प्यातील लेखी परीक्षेचे संचलन दि. 18 जानेवारी ते 15 फेब्रुवारी दरम्यान महाराष्ट्र राज्यातील एकूण 197 परीक्षा केंद्रावर संचलीत होणार आहे. सदर परीक्षेस पदवी, पदव्यूत्तर, विद्यापीठ संचलित अभ्यासक्रमांचे खालील परीक्षा संपन्न होणार आहेत.
या परीक्षेत पदवी अभ्याक्रमाच्या MBBS (CBME-2019): III(I) & III(II) year, 1st to 4th year: BAMS (2010, 2012, 2017), BUMS (New, 2013, 2017): BHMS (Old, New, 2015). B.P.Th (Revised 2012), B.O.Th. (Revised), First/Second/Third/ Fourth/Fifth Semester of B.Sc. (Nursing), All semester of BASLP, BPΟ (2017) 2nd year: BAMS & BUMS (2021) तसेच पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या (Diploma Dentistry/MD-MS Ayurveda & MD-MS Unani/ MD. Homeopathy / Diploma Ayurveda / MOTH / MASLP / M.Sc. (Audiology), M.Sc. (SLP) / MPO), M. Sc-Nursing / MPTh / MPT) परीक्षा घेण्यात येणार आहेत.
विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या अभ्यासक्रमात(BPMT, M.Sc. Pharmaceutical, MPH(N), MBA, B. Optometry, Diploma Optometry/Diploma Ophthalmic, Diploma Paramedical, PG-DMLT, CCMP, MMSPC) च्या लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे.
यामध्ये एकूण अंदाजे 90,873 विद्यार्थी संपूर्ण महाराष्ट्रातून प्रविष्ठ होणार आहे. हिवाळी – 2024 तिसऱ्या टप्प्यातील तृतीय वर्ष एम. बी. बी. एस. व अंतिम वर्ष एम. बी. बी. एस. अभ्यासक्रमांच्या प्रश्नपत्रिका प्रायोगिक तत्वावर (Pilot Basis) ऑनलाईन संगणक प्रणालीद्वारे परीक्षाकेंद्रावर पेपर सुरु होण्याआधी पाठविण्यात येतील असे परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू यांनी स्पष्ट केले.
सदर प्रयोग यशस्वी झाल्यानंतर इतर अभ्यासक्रमांच्याही प्रश्नपत्रिका ऑनलाईन संगणक प्रणालीद्वारे परीक्षाकेंद्रावर परीक्षेच्या दिवशी पाठवून, लेखी परीक्षेच्या प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकांचे संपूर्ण डिजिटलायझेशन करण्याचा मानस असल्याची माहिती डॉ. संदीप कडू यांनी दिली.
तृतीय वर्ष एम. बी. बी. एस. व अंतिम वर्ष एम. बी. बी. एस. अभ्यासक्रमांच्या प्रश्नपत्रिका ऑनलाईन संगणक प्रणालीद्वारे परीक्षाकेंद्रावर परीक्षेच्या दिवशी पाठविण्यात येणार असल्याने सर्व एम. बी. बी. एस. परीक्षार्थींनी परीक्षाकेंद्रावर एक तास आगोदर म्हणजेच सकाळच्या सत्रासाठी सकाळी 09ः00 वाजता तसेच दुपारच्या सत्रासाठी दुपारी 01ः00 वाजता रिपोर्ट करावे असे आवाहन विद्यापीठातर्फे करण्यात येत आहे.