मुंबई :
अंधेरीतील एका स्पा सेंटरमधील कारवाईत गुन्हे शाखेच्या अंमलबजावणी पोलिसांनी मॅनेजर महिलेस अटक करुन सात महिलांची सुटका केली. या सर्व महिलांना मेडीकलनंतर बोरिवलीतील महिला सुधारगृहात पाठविण्यात आले आहे. या महिलेला स्पाच्या नावाने वेश्याव्यवसायासाठी प्रवृत्त केले जात असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. याच गुन्ह्यांत अटक केलेल्या मॅनेजर जरीनाला नंतर आंबोली पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे तर या गुन्ह्यांत रेहानउद्दीन लश्कर याला पाहिजे आरोपी दाखविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
अंधेरी येथे न्यू लिंक रोड, क्रिस्टल पॉईट मॉलमध्ये एक स्पा सेंटर आहे. या स्पामध्ये सेक्स चालविला जात असून काही महिलांना ग्राहकांसोबत वेश्याव्यवसायासाठी पाठविले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा केल्यांनतर गुन्हे शाखेच्या तिथे कारवाई केली होती. या कारवाईत पोलिसांनी मॅनेजर महिला जरीना हिच्यासह सात महिलांना ताब्यात घेतले. या महिलांच्या चौकशीतून स्पामध्ये सेक्स रॅकेट चालत असल्याचे उघडकीस आले. स्पाचा चालक रेहानउद्दीन असून जरीना ही मॅनेजर म्हणून काम करत होती. तीच या महिलांना ग्राहकांसोबत वेश्याव्यवसायासाठी पाठवत होती. हा प्रकार उघडकीस येताच या दोघांविरुद्ध आंबोली पोलिसांनी भारतीय न्याय सहितासह पिटा कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच जरीनाला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर तिला स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान सुटका केलेल्या सातही महिलांची मेडीकल करण्यात आली असून मेडीकलनंतर त्यांना महिला सुधारगृहात पाठविण्यात आले आहे. रेहानउद्दीन हा पळून गेल्याने त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या कारवाईत पोलिसांनी ३७ हजार ७०० रुपयांची कॅश, दोन मोबाईल, एक लॅपटॉप, काही कागदपत्रे आणि इतर मुद्देमाल जप्त केल्याचे पोलिसांनी सांगितले.