क्रीडा

खो-खो विश्वचषक २०२५ : भारत श्रीलंकेशी उपांत्यपूर्व लढतीत आमनेसामने

नवी दिल्ली :

इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये सुरू असलेल्या खो-खो विश्वचषक २०२५ मध्ये भारताच्या पुरुष संघाने सुध्दा महिलांपाठोपाठ दणदणीत विजय साजरा केला. या सामन्यात भारताने भूतानवर ७१-३४ (मध्यंतर ३२-१८)असा ३७ गुणांनी धमाकेदार विजयाची नोंद केली व उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले आहे. सुयश गरगटेला या सामन्यात सामन्याचा मानकरी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

सामन्याच्या पहिल्या टर्नमध्ये भारतीय संघाने आक्रमक सुरुवात करत ३२ गुणांची आघाडी घेतली. भारतीय खेळाडूंनी दाखवलेल्या “स्काय डायव्हिंग” कौशल्याने संपूर्ण प्रेक्षकांची मने जिंकली. चपळाई आणि संघटन कौशल्याचा उत्तम नमुना पाहायला मिळाला.

दुसऱ्या डावात भारताने आपले अफलातून संरक्षण कौशल्य दाखवत भूतानच्या आक्रमणाला दाद दिली नाही. भूतानने वेगवान खेळ करण्याचा प्रयत्न केला, मात्र भारतीय संघाच्या रणनीतीमुळे त्यांना फक्त १८ गुण मिळवता आले.

तिसऱ्या टर्नमध्ये भारताने आक्रमणात पुन्हा जोरदार प्रदर्शन केले. निखिलने अप्रतिम “स्काय डायव्हिंग” कौशल्य दाखवून संघासाठी ३६ गुण मिळवले. भारतीय संघाने उत्कृष्ट समन्वय साधत २८ गुणांची लयलूट केली.

भूतानची निराशाजनक कामगिरी

अंतिम टर्नमध्ये भूतानला त्यांच्या वेळेच्या निम्म्या कालावधीत फक्त ९ गुण मिळवता आले. भारतीय बचावाने त्यांना पुन्हा संधी दिली नाही, आणि सामना ३७ गुणांच्या फरकाने जिंकत भारताने विजयश्री खेचून आणली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *