मुंबई :
१० कॅन्सर सर्व्हायव्हर्स प्रतिष्ठित टाटा मुंबई मॅरेथॉन २०२५ मध्ये सहभागी होणार आहेत. लखनौमधील दोन, दिल्लीतील तीन, कोलकाता येथील एक आणि मुंबईतील चार जण या मॅरेथॉनमध्ये सहभागी होऊन जगभरातील स्पर्धकांशी स्पर्धा करतील. कॅनकिड्स किड्सकॅन, नॅशनल सोसायटी फॉर चेंज फॉर चाइल्डहुड कॅन्सर इन इंडियाअंतर्गत हे मॅरेथॉन रनर्स ‘ड्रीम रन’ विभागात सहभागी होऊन ताकद आणि निश्चयाचे दर्शन घडवतील.
सलग १५ व्या वर्षी कॅनकिड्स किड्सकॅन या प्रतिष्ठित मॅरेथॉनमध्ये सहभागी होऊन लहान कॅन्सर सर्व्हायव्हर्सचे धाडस आणि चिकाटीचा आदर्श घालून देणार आहेत. गेल्या सहा वर्षांत कॅनकिड्स सर्व्हायव्हर्स नियमितपणे या मॅरेथॉनमध्ये सहभागी होत आहेत.
“सर्व्हायव्हर्स या मिशनच्या केंद्रस्थानी आहेत,” असे कॅनकिड्सच्या संस्थापक- अध्यक्ष आणि स्वतःही कॅन्सर सर्व्हायव्हर असलेल्या पूनम बगाई म्हणाल्या. “टाटा मुंबई मॅरेथॉनमधील त्यांचा सहभाग कर्करोगावर मात करण्यासाठी लागणारी ताकद, आशा, निश्चयाचे प्रतीक आहे. ते केवळ सर्व्हायव्हर्स नाहीत, तर सर्वांना प्रेरणा देणारे योद्धे आहेत.”
टाटा मुंबई मॅरेथॉन २०२५ मध्ये सहभागी होणार असलेल्या सर्व्हायव्हर्समध्ये वारासणीतला उदयोन्मुख क्रिकेट खेळाडू सुमित गुप्ता याचा समावेश आहे. वयाच्या सहाव्या वर्षी क्षयरोग आणि अकराव्या वर्षी हॉजकिन्स लिम्फोमाचे (स्टेज ३) निदान झाल्यानंतर सुमितने शस्त्रक्रिया, किमोथेरपी पार पाडत सक्रिय राहिला व क्रिकेटचा ध्यास सुरूच ठेवला. भारताचे प्रतिनिधीत्व करण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सध्या मुंबईत प्रशिक्षण घेत असलेला सुमित कर्करोगाशी लढत असलेल्या मुलांसाठी चिकाटी व आशेचे शक्तीशाली प्रतीक आहे.
त्याशिवाय 21 वर्षांचा अतुल सिंग राठोड का रेटिनोब्लास्टोमाचा सर्व्हायव्हर आहे. वयाच्या फक्त दुसऱ्या वर्षी डोळ्यांचा कर्करोग झाल्यानंतर अतुलला त्याच्या आईने जबरदस्त पाठिंबा आणि एम्समध्ये दर्जेदार उपचार मिळवून दिले. आता वेगाने प्रगती करत असलेला अतुल कर्करोग असलेल्या मुलांमध्ये जागरूकता पसरवत असून त्यांच्यासाठी निधी मिळवत आहे. लहानपणी होणाऱ्या कर्करोगावर मात करताना वेळेवर निदान अतिशय महत्त्वाचे असल्याविषयी तो जनजागृती करत आहे.
जर्म सेल ट्युमर सर्व्हायव्हर सुगंधा कुमारी आता उत्तर प्रदेशातील २०० कॅन्सर सर्व्हायव्हर्सचे प्रतिनिधीत्व करत असून ती कर्करोग झालेल्या मुलांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचे व निधी गोळा करण्याचे काम करत आहे. या मुलांबरोबरच १७५ कॅनकिड्स सपोर्टर्स, इतर रनर्स, ज्येष्ठ नागरिक धावणार आहेत. या गटामध्ये १०० हाफ- मॅरेथॉन पूर्ण केलेल्या विद्या, या मॅरेथॉन रनर सहभागी होणार आहोत. आपल्या १२ व्या टीएमएममध्ये कॅनकिड्ससह धावण्यासाठी त्या खास सिंगापूरवरून येत आहेत. ‘कॅन्सर सर्व्हायव्हर असलेल्या लहान मुलांसोबत धावणं हा वेगळीच उर्जा आणि अभिमान देणारा अनभव असतो. या मुलांचा उत्साह पाहाणं भारावणारं असतं,’ असं विद्या म्हणाल्या