मुंबई :
माता आणि नवजात बाळाला सर्वच स्तरावर उत्तमोत्तम आरोग्यसेवा पुरविण्याचा ध्यास घेत ग्लेनईगल्स हॉस्पिटल्स, परळ येथे अत्याधुनिक प्रसूती सेवांसह एक उच्च-तंत्रज्ञान असलेले नवजात अर्भक अतिदक्षता कक्ष (एनआयसीयू) नुकतेच सुरु करण्यात आले आहे.
चार खाटांचे अत्याधुनिक एनआयसीयू 30 दिवसांपर्यंत नवजात शिशुची काळजी घेण्यासाठी खास डिझाइन केले आहे. अकाली जन्मलेल्या तसेच गंभीर जन्मजात समस्यांनी पिडीत बाळांवर याठिकाणी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत यशस्वी उपचार केले जाणार आहे. यामध्ये प्रगत व्हेंटिलेटर, वॉर्मर्स आणि न्यूरोडेव्हलपमेंट असेसमेंट टूल्सचा समावेश आहे ज्यात श्वसन समस्या, संक्रमण आणि विकासात्मक वाढीच्या समस्यांना सामोरे जावे लागते. येथील सुविधेमध्ये प्रशिक्षित बालरोगतज्ञ आणि परिचारिका उपलब्ध आहेत. चोवीस तास देखभाल आणि तज्ञांची उपलब्धता याठिकाणी सुनिश्चित करण्यात आली आहे.
मुंबईतील परळ येथील ग्लेनईगल्स हॉस्पिटल्सचे सीईओ डॉ. बिपिन चेवले यांनी नव्याने सुरु झालेल्या या सेवेबाबत अभिमान व्यक्त करतात. या अत्याधुनिक एनआयसीयू आणि प्रसूती सेवा पुरविणे हे रुग्णालयाचे मुख्य उद्दिष्ट्य आहे. नवजात शिशु आणि मातांसाठी सर्वोत्तम परिणाम सुनिश्चित करण्यासाठी या सुविधा अत्याधुनिक तंत्रज्ञानासह वैयक्तिक लक्ष पुरवितात. आमच्या आरोग्यसेवेतील प्रवासात हा एक महत्त्वाचा टप्पा आहे असेही डॉ. चेवले यांनी स्पष्ट केले.
डॉ. फजल नबी (वरिष्ठ सल्लागार बालरोगतज्ज्ञ) हे एनआयसीयूच्या प्रगत वैशिष्ट्यांविषयी सांगतात की,
नवजात बालकांना अनेकदा जटिल आव्हानांना तोंड द्यावे लागते, श्वसनाच्या त्रासापासून ते विकासात्मक अडचणींमध्ये त्यांना अचूक आणि चोवीस तास काळजी घेणे आवश्यक असते. नवजात बालकांच्या शारीरिक आणि संज्ञानात्मक वाढीस समर्थन देण्यासाठी आमचे एनआयसीयू हे प्रगत व्हेंटिलेटर आणि आधुनिक न्यूरोडेव्हलपमेंट साधनांसह नवीनतम तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे.
एनआयसीयूला पूरक म्हणजे रुग्णालयाच्या व्यापक प्रसूती सेवा, ज्यामध्ये एक विशेष डिझाइन केलेला लेबर सूटचा अनुभव घेता येणार आहे. मातृत्वाच्या प्रवासात आई आणि बाळाला विशेष खास सुविधा पुरवित त्यांना या क्षणाचा पुरेपुर लाभ घेता यावा याकरिता या सूट्समध्ये खास डिझाईन केलेली वैयक्तिक खोली आणि पूर्णपणे सुसज्ज असे प्रसूती कक्षाचा समावेळ आहे ज्यामुळे मातांसाठी प्रसुतीचा अनुभव अविस्मरणीय आणि तितकाच आनंददायी राहिल.
डॉ. अनघा छत्रपती (वरिष्ठ सल्लागार स्त्रीरोग तज्ज्ञ) सांगतात की, आमचे नवीन प्रसूती सूट्स बाळंतपणाला कायमस्वरुपी लक्षात राहणारा अनुभव देण्यासाठी डिझाइन केला गेला आहे. यामध्ये आईसाठी खाजगी जागा, प्रगत वैद्यकीय सुविधा पुरविण्याती आम्ही खात्री करतो. या मौल्यवान प्रवासाच्या प्रत्येक क्षणाचा आनंद घेण्यासाठी याचा नक्कीच फायदा होईल
हे आधुनिक एनआयसीयु व प्रसुती सुविधा या
ग्लेनईगल्स हॉस्पिटल्सच्या उपक्रमाला भावनिक आधारासह उत्तमोत्तम वैदेयकिय सेवा पुरविण्याचा प्रयत्न करते. नवजात बाळ व आईसाठी एक नवी सुरुवात अवस्मरणाय ठरावी याकरिता ही सुविधा नक्कीच उपयुक्त ठरेल.