सध्या एस टी महामंडळात जवळपास ९० टक्क्यांपेक्षा जास्त खराब नादुरुस्त बस आहेत, मेन्टनस व्यवस्थित नाही. फक्त किलोमीटर करून घेण्याच्या उद्देशाने नादुरुस्त बस लाईनवर दिल्या जातात. मेन पाटा तुटला, कव्हर पाटा तुटला तरी चालक वाहकाच्या जीवाची पर्वा तर नाहीच पण प्रवाशांच्या पण जीवाशी खेळत आहेत. समोरील लाईटने चालकाला दिसत नाही. बसमध्ये प्रवाशांना बसायला व्यवस्थित सीट नाहीत. खिडकीला काचा नाहीत. ज्या काही आहेत त्या लागत नाहीत. दोन खिडकीत एक काच असते, त्यावरून प्रवाशी भांडत असतात, गाडीच्या बॉडीचा खूप मोठ्या प्रमाणावर आवाज येतो. चालकाला बसायला तर कधीच आणि कोणत्याच बसमध्ये व्यवस्थित सीट नाही. प्रवाशी दरवाजाला पट्टी नाही आणि असली तर लागत नाही.
विनाकारण दिलेल्या सवलतीमुळे वाढलेली तुफान गर्दी, नादुरुस्त बस यामुळे वाहकांची मानसिकता खराब होत आहे. त्यात तिकीट दरवाढ ही 11, 21, 31, 41, 51, 61, 71, 81, 91, 102 ही जाणीव पूर्वक केलीली दिसून येते. याच कारणांनी वाहकाची मानसिकता आणखी खराब होऊन वाहकाची केस मार्ग तपासणी पथक विनाकारण घेत आहेत. बसमध्ये ९० ते १०० च्याही वर प्रवाशी असतात. तरी विचार केला जात नाही. काही काही चेकिंगवाले तर अतिरेकी पकडायला चालल्यासारखे सिनेस्टाईलने वाहकावर हल्ला करतात. रस्त्याला गाडी लावून रात्री पण रॉंग साईडने बसला आडवे पळतात, ना बसमधील प्रवाशी गर्दीचा विचार केला जातो. न नादुरुस्त बसचा विचार केला जातो. त्या वाहकाचे काम चालू असेल तर त्याचा पण विचार करत नाही. काम चालू असताना पण वाहकाकडून मशीन घेतली जाते. काही काही चेकिंगवाले तर तिकीट पण बदलतात. एवढी नीच मानसिकता कोणत्याच क्षेत्रात भारतातच काय पण विश्वात पण नाही. विनाकारण काहीही कारण नसताना कॅश डाउन करणे, बॅच लावाला नाही. रा. प. म. लावलं नाही. असे कारण काढतात. तिकीट दिले असले तरी टाकून देऊन नाही दिले असे सांगतात. अजून एक गजब कहाणी कि अमृत जेष्ठ नागरिकाला तिकीट चेक करताना विचारतात कि कुठून बसले आणि कुठे चालले, आता त्यात काय वाहक अपहार करणार ऐवडा मूर्खपणा असू नये.? काही नाही सापडले तर पाकीट दाखवा पैसे दाखवा, वाहकाचे खिसे तपासणे, चालकाचे खिसे तपासणे ऐवढ पण बेइज्जत वाहकाला करू नये. चालक वाहक हे एस टी महामंडळाचा कणा आहेत. कणा मोडला तर एस. टी. पण वाचणार नाही.
सर्व चालक वाहकांची परिवहन मंत्री साहेबाला हात जोडून विनंती की साहेब आपल्या बसमध्ये सीट नाहीत, ओ प्रवाशाला बसायला आधी नवीन स्वमालकीच्या बस खरेदी करा. नंतर स्टॅन्ड बांधा. नुसते नवीन स्टॅन्ड बांधून त्यात दिवसभर प्रवाशी ठेवायचे का? बस संख्या खूप कमी आहे. प्रवाशाला बसायला बस पाहिजे स्टॅन्ड नाही. आपला उद्देश प्रवाशी वाहतूक आहे, प्रवाशी साठवणे नाही ? अलीकडेच काम केलेल्या स्टॅंडचे तुम्ही काम करता? मेन्टनसला पैसा नाही, डिझेल टँकर घ्यायला कधी कधी पैसे नसतात. कर्मचारी यांचे पगार तर बाजूला ठेवा. त्यांचा काय विचार करणार?
आताच नवीन लाईट फिटिंग, स्टॅंडमधील फरशी, कलर केलेल्या स्टॅंडचे गरज नसताना तुम्ही काम करता, येथे ऑइल नाही बसला काळे ऑइल वापरले जाते. स्टेरिंग ऑइल काळे झालेले वापरले जाते. टायर नाहीत बसला? खिडकीच्या काचा तर नाहीतच? कशाला देखावा करता स्टॅन्ड बांधून? हा सर्व भ्रष्टाचार थांबवा. कशाला भाडे तत्वावर बस घेता. आपले महामंडळ बस खरेदी करू नाही का शकत? कर्मचाऱ्यांचा नाही तर प्रवाशांच्या जीवाचा विचार करा. सध्या बस पेटण्याचे प्रकार चालू आहेत. मेन्टनसला पैसे नाही, डिझेलला पैसा नाही, कर्मचारी यांचे वेतन द्यायला पैसे नाहीत. मग कशाला करता ढोंगी पणा स्टॅन्ड बांधून? लाज वाटते प्रवाशांकडून तिकीट घेताना, काय सुविधा आहे बसमध्ये प्रवाशाला सीट नाही. खिडकीला काच नाही. बॉडीचा खूप मोठ्या प्रमाणावर आवाज येतो. हे कुठेतरी थांबवा, चालक वाहक याचे बळी जात आहेत, चालक वाहक यांना कोणी वाली नाही. ते पण माणसच आहेत त्यांना पण इज्जत द्या आणि इज्जतीने जगु द्या.
– श्रीरंग बरगे, (लेखक महाराष्ट्र एस.टी. कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस आहेत)