
मुंबई :
१६ व्या शिवाजी पार्क जिमखाना राज्य मानांकन कॅरम स्पर्धेला ८ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ९ वाजता शिवाजी पार्क जिमखान्यात पुरुष एकेरी गटाने सुरुवात होत आहे. महाराष्ट्र कॅरम असोसिएशन व मुंबई डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने आयोजित करण्यात येणाऱ्या आणि सारस्वत बँकेचा पुरस्कार लाभलेल्या या स्पर्धेत पुरुष एकेरी गटात ३०० तर महिला एकेरी गटात ४४ खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहेत. पुरुष एकेरी गटात मुंबईच्या विकास धारियाला तर महिला एकेरी गटात मुंबईच्या काजल कुमारीला प्रथम मानांकन देण्यात आले आहे. स्पर्धेतील महत्वाच्या सामन्यांचे थेट प्रक्षेपण महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या युट्युब चॅनलवरून करण्यात येणार आहे.
स्पर्धेतील मानांकन
पुरुष एकेरी : १) विकास धारिया (मुंबई), २) महम्मद घुफ्रान (मुंबई), ३) सागर वाघमारे (पुणे), ४) रिझवान उस्मान शेख (मुंबई उपनगर), ५) योगेश परदेशी (पुणे), ६) झैद अहमद फारुकी (ठाणे), ७) संजय मांडे (ठाणे), ८) संदीप दिवे (मुंबई उपनगर)
महिला एकेरी : १) काजल कुमारी (मुंबई). २) मधुरा देवळे (ठाणे), ३) समृद्धी घाडीगावकर (ठाणे), ४) दीक्षा चव्हाण (सिंधुदुर्ग), ५) प्राजक्ता नारायणकर (मुंबई उपनगर), ६) आकांक्षा कदम (रत्नागिरी), ७) रिंकी कुमारी (मुंबई), ८) केशर निर्गुण (सिंधुदुर्ग)