शहर

एसटीचे नवीन अध्यक्ष संजय सेठी यांचे लालपरीची प्रतिकृती भेट देऊन एसटी संघटनेकडून स्वागत

मुंबई :

कुठल्याही संस्थेत तिचे कर्मचारी समाधानी असतील तर संस्थेत चांगले काम होऊन भरभराट होईल. पण एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना वाढीव महागाई भत्ता, पी.एफ. अँडव्हान्स, वैद्यकीय बिलांची प्रतिपूर्ती या रक्कमा मिळाल्या नसून या समस्यांचे ओझे घेऊन कर्मचारी काम करीत आहेत. या समस्याचे ओझे कमी करून निराकरण झाल्यास संस्थेची भरभराट झाल्याशिवाय राहणार नाही, असे मत महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी व्यक्त केले आहे.

एसटीचे नवीन अध्यक्ष संजय सेठी यांची आज मंत्रालयातील त्यांच्या दालनात भेट घेऊन त्यांना कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांचे निवेदन देण्यात आले व संघटनेतर्फे लालपरीची प्रतिकृती भेट देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर झालेल्या चर्चेची माहिती पत्रकारांना देण्यात आली.

एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारातून कपात केलेली १२०० कोटी रुपयांची रक्कम एसटीने पी.एफ.ट्रस्टमध्ये भरली नसून ट्रस्टकडे गुंतवणुकी व्यतिरिक्त काहीच रक्कम शिल्लक नसल्याने राज्यभरातील ३००० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना ऑक्टोंबर पासून पी एफ अँडव्हान्स रक्कम मिळालेली नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांना त्यांच्या कुटुंबीयांचे आजारपण, मला मुलींची लग्ने, शाळा कॉलेजचा खर्च यासाठी आपल्याच हक्काच्या जमा रक्कमेतून पैसे मिळत नाहीत. याचबरोबर बहुतांशी कर्मचाऱ्यांना वैद्यकीय बिलांच्या खर्चाची प्रतिपूर्ती साधारण १५० कोटी रुपये इतकी रक्कम सुद्धा वर्षभरापासून मिळालेली नसून कुटुंबीयांचा व स्वतःचा वैद्यकीय खर्च कसा करायचा या चिंतेत कर्मचारी सापडले आहेत. या शिवाय जानेवारी २०२४ पासून वाढलेला चार टक्के महागाई भत्ता सुद्धा कर्मचाऱ्यांना मिळाला नसून या आर्थिक प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी अर्थ खात्याकडून एसटीला निधी उपलब्ध करून देण्यासाठी थकीत रक्कमांचा आढावा घेऊन अर्थ खात्याकडून एसटीला निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, अशी विनंतीही बरगे यांनी या वेळी झालेल्या चर्चे दरम्यान नवीन अध्यक्षांना केली.

या शिवाय संजय सेठी हे राज्य परिवहन प्राधिकरणाचे पदसिद्ध अध्यक्ष असल्याने हल्लीच जी एकच्या पटीत भाडेवाढ करण्यात आली आहे. त्यामुळे सुट्या पैशावरुन वाहक व प्रवाशी यांच्यात दररोज खटके उडत असून त्याचा उतपन्नावर सुद्धा परिणाम झाला आहे. त्यामुळे सूत्रात बदल करून भाडेवाढ पाचच्या पटीत करण्याचा निर्णय घेण्यात यावा, अशी विनंती सुद्धा त्यांना करण्यात आली. या वेळी संतोष गायकवाड, सुमन ढेंबरे, संतोष माळी, कमलाकर जोशी, आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *