
मुंबई :
महाराष्ट्र कॅरम असोसिएशन आयोजित तसेच मुंबई डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशन व सेंट्रल रेल्वे इन्स्टिटयूट दादर यांच्या सहकार्याने ५८ व्या सब जुनियर महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धेचे आयोजन ९ मार्च २०२५ रोजी एम. सी. ए. ट्रेनिंग सेंटर, सेंट्रल रेल्वे इन्स्टिटयूट दादर, वेस्टर्न रेल्वे प्लॅटफॉर्म क्रमांक ७ व सेंट्रल रेल्वे प्लॅटफॉर्म क्रमांक ८ च्या मध्ये, शंकर मंदिराजवळ, दादर, मुंबई करण्यात आले आहे.
१२ वर्षाखालील मुले एकेरी, १२ वर्षाखालील मुली एकेरी ( कॅडेट गट ), १४ वर्षाखालील मुले एकेरी व १४ वर्षाखालील मुली एकेरी ( सब जुनियर गट ) अशा ४ विभागात हि स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्र कॅरम असोसिएशनला संलग्न असलेल्या जिल्यांमार्फत १२ वर्षाखालील गटात प्रत्येकी २ खेळाडू व १४ वर्षाखालील गटात प्रत्येकी ६ खेळाडूंची नावे संलग्न जिल्हा कॅरम संघटनांमार्फत राज्य कॅरम संघटना स्वीकारेल. प्रवेशिका नोंदविण्याची अंतिम मुदत १ मार्च २०२५ असून स्पर्धेचे प्रवेश अर्ज महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या www.maharashracarromassociation.com या संकेत स्थळावर उपलब्ध करण्यात आले आहेत.