
मुंबई :
‘महाशिवरात्री’ निमित्त बुधवार, दिनांक २६ फेब्रुवारी २०२५ रोजी सार्वजनिक सुटी आहे. असे असले तरी, दिनांक बुधवार, दिनांक २६ फेब्रुवारी २०२५ रोजी वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय जनतेकरिता खुले राहणार आहे. तर दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवार, दिनांक २७ फेब्रुवारी २०२५ रोजी बंद असेल, असे बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून कळविण्यात येत आहे.
भायखळा (पूर्व) परिसरातील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय साप्ताहिक सुटीनिमित्त दर बुधवारी बंद असते. मात्र, बृहन्मुंबई महानगरपालिकेने यापूर्वी मंजूर केलेल्या एका ठरावानुसार बुधवारी सार्वजनिक सुटी आल्यास त्यादिवशी उद्यान व प्राणिसंग्रहालय जनतेसाठी खुले राहते, तर त्याच्या दुसऱ्या दिवशी बंद ठेवण्यात येते.
सबब, या ठरावानुसार बुधवार, दिनांक २६ फेब्रुवारी २०२५ रोजी ‘महाशिवरात्री’ निमित्त वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालय जनतेसाठी खुले राहणार आहे, असे बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून कळविण्यात येत आहे.