
मुंबई :
रोटरी क्लब ऑफ मुंबई पार्लेश्वर आयोजित आणि छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती जुहू, मुंबई यांच्या सहकार्याने ५ वी रोटरी क्लब ऑफ मुंबई पार्लेश्वर राज्य मानांकन कॅरम स्पर्धा दिनांक २९ ते ३१ मार्च २०२५ दरम्यान प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुल, शहाजी राजे मार्ग, विले पार्ले ( पूर्व ), मुंबई येथे आयोजित करण्यात आली आहे. पुरुष एकेरी व महिला एकेरी अशा दोन गटात आयोजित केलेली ही स्पर्धा उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेने सलग दुसऱ्या वर्षी पुरस्कृत केली आहे. तर स्पर्धेतील विजेत्यांना एकंदर १ लाख १० हजारांची रोख पारितोषिके व चषक देण्यात येणार आहे.
स्पर्धेचे प्रवेश अर्ज महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या www.maharashtracarromassociation.com या संकेत स्थळावर उपलब्ध आहेत. स्पर्धेसाठी नावे स्वीकारण्याची अंतिम तारिख १० मार्च २०२५ असून खेळाडूंनी आपली नावे नोंदविण्यासाठी आपल्या जिल्हा कॅरम संघटनेशी संपर्क करावा. मुंबईतील खेळाडूंची नावे क्लब मार्फत दिनांक १० मार्च २०२५ रोजी सायंकाळी ७ ते ९ दरम्यान महाराष्ट्र कॅरम असोसिएशन, पारेख महल बिल्डिंग, सखाराम कीर मार्ग, आश्रय हॉटेलच्या मागे, राजा राणी चौक जवळ, शिवाजी पार्क, दादर येथे स्वीकारण्यात येतील.