
मुंबई :
एसएनडीटी महिला विद्यापीठ, मुंबई येथे आयोजित दोन दिवसीय ‘स्वानुभव २०२५ वार्षिक प्रदर्शन आणि विक्री’ या कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन आणि विस्तार विभाग व समाजकार्य विभागतर्फे भरविण्यात आलेल्या या वार्षिक प्रदर्शनाचे ब्रीदवाक्य होते ‘समाजकार्याचा अनुभव…एसएनडीटीचा स्वानुभव’ यामध्ये विद्यार्थिनी आणि समाजातील लोकांनी तयार केलेले उत्पादने व विक्री अशी संकल्पना असलेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन ५ मार्च २०२५ रोजी एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरू प्रा. डॉ. उज्वला चक्रदेव यांच्या हस्ते झाले. त्यांनी उद्घाटन प्रसंगी उपस्थितांशी बोलताना, संस्कृता स्त्री प्रशक्ती या विद्यापीठाच्या घोषवाक्याप्रमाणे महिलांनी एकमेकांना साथ देत प्रगती करावी, असे आवाहन केले. तसेच एसएनडीटी महिला विद्यापीठाने ‘स्वानुभव’च्या माध्यमातून महिलांसाठी चांगले व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आहे, असे सांगितले.
या वेळी उपस्थित प्रमुख अतिथी डॉ. मंजू लोढा अध्यक्षा, लोढा फाऊंडेशन यांनी आपल्या कविता सादर करत उपस्थितांशी संवाद साधला. भारतीय समाजात महिला सक्षमीकरण महत्त्वाचे असल्याचे नमूद केले. यावेळी उपस्थित कार्यक्रमाचे आयोजक म्हणून आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागाचे संचालक प्रा. डॉ. प्रभाकर चव्हाण यांनी ‘स्वानुभव २०२५’ची संकल्पना व प्रस्तावना दिली. उद्घाटन प्रसंगी विद्यापीठाच्या प्र कुलगुरू प्रा. डॉ. रुबी ओझा, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर हे देखील उपस्थित होते. उद्घाटन समारंभाच्या कार्यक्रमाचे आभार विद्यापीठाचे उपकेंद्र, पुणे येथील डॉ. भास्कर उगवे यांनी आभार मानले. यावेळी समाजकार्य विभागातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग आणि विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
‘स्वानुभव २०२५’च्या निमित्ताने एकूण ९७ संस्थानी सहभाग घेतला होता. हे दोन दिवसीय प्रदर्शन एसएनडीटी महिला विद्यापीठ, चर्चगेट आवारात भरविण्यात आले होते. या दोन दिवसीय प्रदर्शनाला जवळपास ५ हजार लोकांना प्रदर्शनास भेट दिली. यामध्ये स्वयसेवी संस्था, कर्मचारी , प्रभागातील कर्मचारी, तसेच विविध विद्यापीठातील कुलगुरू, प्र. कुलगुरू यांनीही भेटी दिल्या. प्रेक्षकांचा व समाजकार्यातील संस्थाचा उत्तम प्रतिसाद लाभलेल्या ‘स्वानुभव २०२५’ प्रदर्शन आणि विक्री कार्यक्रमाचा समारोप ६ मार्च २०२५ रोजी पार पडला. या प्रसंगी प्रमुख पाहुण्या डॉ. मीना चंदावरकर, माजी कुलगुरू यांनी स्वानुभवचे कौतुक करताना हे स्वानुभव प्रदर्शन- विक्री आयोजन अधिक दिवसांचे असावे जेणेकरून याचा लाभ अधिकाधिक लोकांना घेता येईल असे मत व्यक्त केले.
तसेच पूर्णिमा मेहता, गव्हर्नर नामनिर्देशित, व्यवस्थापन परिषदेच्या सदस्य, डॉ मेधा तापियावाला, अधिष्ठाता ह्युमॅनिटी, आणि जयश्री शिंदे तसेच पोलीस उपनिरीक्षक ज्योती मेदकुट्टी व प्रा. डॉ प्रभाकर चव्हाण, संचालक आजीवन अध्ययन आणि विस्तार विभाग व समाजकार्य विभाग, विभागातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग आणि विद्यार्थिनी उपस्थित होते. या प्रसंगी विभागातील विद्यार्थिनींनी उत्कृष्ट सांस्कृतिक कार्यक्रम व प्रबोधनात्मक पथनाट्य सादर केले व उपस्थित स्वयसेवी संस्थांच्या प्रतिनिधींचे मनोगत व्यक्त करण्यात आले. त्यांना आभार पत्र देऊन गौरविण्यात आले.