आरोग्य

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे आयोजित रक्तदान शिबीरात ऐतिहासिक यश

मुंबई :

इनर वॉइस फाउंडेशन आणि नायर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) रेल्वे स्थानकावर २७.०२.२०२४ आणि २८.०२.२०२४ रोजी आयोजित दोन दिवसीय रक्तदान शिबीरात एकूण २३७ युनिट रक्तदान करण्यात आले. नायर हॉस्पिटलनुसार, CSMT रेल्वे स्थानकावर आतापर्यंत आयोजित रक्तदान शिबिरांमध्ये हे सर्वाधिक रक्त संकलनाचे नवीन कीर्तिमान आहे.

या रक्तदान शिबीराच्या अभूतपूर्व यशामध्ये इनर वॉइस फाउंडेशन, नायर हॉस्पिटल, सायन हॉस्पिटल,रोटरी क्लब ऑफ़ नरिमन पॉइंट, इंडियन मेडिकल असोसिएशन, महावीर इंटरनेशनल मुंबई, VIT कॉलेज, SNDT कॉलेजच्या विद्यार्थ्यांबरोबरच सर्व हितचिंतकांचा महत्वपूर्ण सहभाग होता. सर्व रक्तदात्यांचे आणि सहयोगींचे प्रयत्न यामुळे हे शिबीर अत्यंत यशस्वी ठरले.

शिबीराच्या यशस्वितेमध्ये दिनेश वाकचौरे, शिव कुमार चौरसिया, रामकृष्ण तल्ला, अमित सी., प्रकाश रोकडे आणि सरस्वती हेब्बर यांचे विशेष योगदान होते. त्याशिवाय, इनर वॉइस फाउंडेशनच्या सर्व सदस्यांनी आपला बहुमूल्य वेळ देऊन या रक्तदान शिबीरात स्वेच्छेने सेवा केली. फाउंडेशनकडून सर्वांना मनापासून धन्यवाद. या यशस्वी रक्तदान शिबीराच्या माध्यमातून समाजात रक्तदानाची जागरूकता वाढवण्याचा आणि अधिकाधिक लोकांना या कार्यात सहभागी करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

शिबीरात प्रमुख अतिथींची उपस्थिती : या कार्यक्रमात सेंट्रल रेलवेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्निल निला, जनसंपर्क अधिकारी मायकल, वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय तायडे, स्टेशन प्रबंधक आर. के. पंडा, इनर वॉइस फाउंडेशनचे अध्यक्ष सुयोग कारंडे, सचिव श्रीगणेश खंदारे, कोषाध्यक्ष निलेश शिंदे, मुकुल सालूंखे, गणेश हिंगे, पी. डी. राऊळकर, श्वेता घोने, प्रणाली मोने, सचिन लाल, लक्मण बोरा, डी. के. श्रीवास्तव, एस. बी. रणदिवे, नायर हॉस्पिटलचे अनिल गरे, कांतिलाल पवार, विनोद साडवीलकर यांच्यासह अनेक डॉक्टर व कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *