गुन्हे

मेल एक्स्प्रेसमध्ये महिला प्रवाशांचा किंमती ऐवज चोरणारा अटकेत

कल्याण :

मेल एक्स्प्रेस मध्ये झोपलेल्या महिला प्रवाशांचा किंमती ऐवज चोरणाऱ्यां एका चोराला रेल्वे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. रेल्वे प्रवासामध्ये प्रवाशांच्या मौल्यवान वस्तू चोरीला जाण्याच्या घटना कल्याण, वसई दरम्यान वाढल्या होत्या. त्या अनुषंगाने वरिष्ठाच्या मार्गदर्शन खाली गुन्हे शाखा युनिट-3, कल्याण, लोहमार्ग, मुंबई पथकाने तपास सुरू केला. त्यानुसार कल्याणात रेल्वे चोरी प्रकरणी रेकॉर्ड वर असलेला गुन्हेगार येणार असल्याची खबर रेल्वे क्राईम ब्रांच पोलिसांना मिळाली.

मंगळवार १८ फेब्रुवारी रोजी पोलिसांनी कल्याण रेल्वे स्थानक परिसरात सापळा रचित चोरी करण्याच्या उद्देशाने आलेल्या आरोपी अरूण घाग ऊर्फ विकी, वय ३२ वर्षे, राह – चेंबूर मुंबई यांस ताब्यात घेतले. त्याच्याकडे सखोल तपास केला असता दिनांक २८ जानेवारी रोजी इदौर दौड एक्सप्रेस गाडी गाडीतून प्रवास करीत असताना महिलेचा किंमती ऐवज असलेली लेडीज पर्स चोरी झाल्याबाबत कल्याण रे.पो.ठाण्यात दाखल झाला होता. हा गुन्हा अरूण याने केल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्याने त्याला या गुन्हयात अटक करण्यात येवून पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आले.

पोलीस कस्टडीत असताना त्याने सदर गुन्हयासह एकूण तीन गुन्हे केल्याची कबूली दिली असून, गुन्हयातील चोरी केलेले सोन्याचे दागिने झवेरी बाजार मुंबई येथील दोन सोनार तानाजी माने आणि नितीन येळे, मुंबई यांना विक्री केल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्या अनुशंगाने त्यांना गुन्हयात अटक करून त्यांच्याकडून गुन्हयातील चोरी केलेल्या दागिन्यापासून बनविलेल्या सोन्याच्या लगडी, मोबाईल फोन व रोख रक्कम हस्तगत करून तीन गुन्हे उघडकीस आणले आहेत.

ही कामगिरी लोहमार्ग पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, पोलीस उपआयुक्त मनोज पाटील, सहा. पोलीस आयुक्त राजेंद्र रानमाळे, यांच्या मार्गदर्शन व सूचनानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय खेडकर, व पो. निरीक्षक रोहीत सावंत गुन्हे शाखा, लोहमार्ग, मुंबई, यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शाखा, कल्याण युनिट येथील सपोनि अभिजित टेलर, पो.उपनिरीक्षक प्रकाश चौगुले, सपोउपनिरी संदिप गायकवाड, रविंद्र दरेकर, पोलीस अंमलदार लक्ष्मण वळकुंडे, अजय रौंधळ, राम जाधव, प्रमोद दिघे, रविंद्र ठाकुर, वैभव जाधव, हितेश नाईक, स्मीता वसावे, पदमा केंजळ, अक्षय चव्हाण, रुपेश निकम, सुनिल मागाडे, तांत्रिक शाखेचे सपोनिरीक्षक मंगेश खाडे, पोहवा विक्रम चावरेकर, संदेश कोंडाळकर, पोशि अमोल अहिनवे यांनी केला असुन, या गुन्ह्याचा पुढील तपास पोहवा वळकुंडे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *