
मुंबई :
दिनांक १७ ते २१ मार्च २०२५ दरम्यान दिल्ली येथील तालकटोरा इनडोअर स्टेडियम मध्ये ५२ वी वरिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धा संपन्न होणार आहे. गेल्या वर्षभरातील कामगिरीवरून महाराष्ट्राचा पुरुष आणि महिलांचा संघ निवडण्यात आला असून दिनांक १२ ते १४ मार्च २०२५ या कालावधीत ३ दिवसांचे सराव शिबीर एम. सी. ए. ट्रेनिंग सेंटर, सेंट्रल रेल्वे इन्स्टिटयूट दादर येथे आयोजित करण्यात आले आहे. १५ मार्च २०२५ रोजी महाराष्ट्राचा संघ राजधानी एक्सप्रेसने दिल्लीला रवाना होत आहे. महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्यावतीने संघाला वातानुकूलित प्रवास व्यवस्था, हातखर्ची भत्ता व गणवेश देण्यात आला आहे.
महाराष्ट्राचा संघ पुढीलप्रमाणे :
पुरुष संघ : १) विकास धारिया, संजय मांडे, फहिम काझी ( सर्व मुंबई ) सागर वाघमारे ( पुणे ), पंकज पवार ( ठाणे ), रिझवान शेख ( मुंबई उपनगर ) आणि संजय देसाई ( संघ व्यवस्थापक ).
महिला संघ : मधुरा देवळे, चैताली सुवारी ( ठाणे ), केशर निर्गुण, दीक्षा चव्हाण ( सिंधुदुर्ग ), रिंकी कुमारी, सिमरन शिंदे ( मुंबई ) आणि प्राची जोशी ( संघ व्यवस्थापक ).