शिक्षण

मुंबई विद्यापीठाच्या बीकॉम सत्र ६ ची परीक्षा १८ मार्चपासून

एकूण २८४ परीक्षा केंद्रावर ५४,८९२ विद्यार्थी देणार परीक्षा

मुंबई :

मुंबई विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०२४-२५ च्या उन्हाळी सत्राच्या बीकॉम सत्र ६ ची परीक्षा आजपासून ( दिनांक १८ मार्च २०२५) सुरू होत आहे. एकूण २८४ परीक्षा केंद्रावर आयोजित होत असलेल्या या परीक्षेला एकूण ५४,८९२ एवढे विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. मुंबई विद्यापीठाच्या मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी,सिंधुदुर्ग व पालघर जिल्ह्यातील विविध संलग्नित महाविद्यालयातील एकूण २८४ परीक्षा केंद्रावर ही परीक्षा आयोजित केली जात आहे.

बीकॉम परीक्षेसह स्वयअर्थसहाय्यित बीएएमएस, अकाऊंटिंग फायनान्स आणि बँकिंग अँड इन्श्युअरन्ससह इतरही अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे आयोजन करण्यात आले आहे. या सर्व परीक्षांची हॉल तिकिटे विद्यार्थ्यांना यापूर्वीच त्यांच्या लॉगिनमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहेत. आजपासून आयोजित या सर्व परीक्षांना एकूण ८२,९९५ एवढे विद्यार्थी प्रविष्ठ झाले आहेत. ज्यामध्ये ७३,३०९ एवढे नियमित विद्यार्थी व ९,६९२ एवढे पुनर्परिक्षार्थी विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या परीक्षांना एकूण ३९,६१७ एवढ्या मुली आणि ४३,३७७ एवढ्या मुलांचा समावेश आहे. तर बीकॉम परीक्षेसाठी प्रविष्ठ झालेल्या ५४,८९२ विद्यार्थ्यांपैकी सर्वाधिक २८,६११ एवढे मुले आणि २६,२७४ एवढ्या मुलींचा समावेश आहे.

मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून या सर्व परीक्षांच्या तयारीचा आढावा घेण्यात आला असून विद्यापीठाने सर्व लीड आणि क्लस्टर महाविद्यालयाच्या बैठका घेतल्या आहेत. परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्याबरोबरच जलदगतीने अचूक मूल्यांकन करून निर्धारित वेळेत निकाल जाहीर करण्यासाठी विद्यापीठाने पूर्ण तयारी केली आहे. परीक्षा पद्धतीत आमुलाग्र बदल करत विद्यापीठाने यापूर्वीच ऑनलाईन उपस्थिती, बारकोड व विद्यार्थ्यांची सर्व माहिती असणाऱ्या स्टिकरचा वापर करण्यास सुरुवात केली असल्याचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालिका डॉ. पूजा रौंदळे यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *