शहर

उन्हाळा हा सापांसाठी धोक्याचा इशारा; सर्पदंशावर काय करावे आणि काय करू नये

मुंबई :

भारतात सर्पदंश गंभीर सार्वजनिक आरोग्यसंबंधित समस्या आहे, ज्यामध्ये हजारो मृत्यू होतात आणि अपंगत्व येते. जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्‍ल्‍यूएचओ) आकडेवारीनुसार, जगभरात दरवर्षी ४.५ दशलक्ष ते ५.४ दशलक्ष व्‍यक्‍तींना साप दंश करतात. जगभरात सर्पदंशामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या भारतात सर्वाधिक आहे. सर्पदंश ही जगातील सर्वात महत्वाच्या दुर्लक्षित आरोग्य समस्यांपैकी एक आहे, जेथे सर्पदंशाचा मोठ्या प्रमाणात समुदायांवर परिणाम होतो.

नोव्हेंबर २०२४ मध्ये, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने (एमओएचएफडब्‍ल्‍यू) सर्पदंशाच्‍या केसेस आणि मृत्यूंना ‘नोटिफायेबल डिसीज’ म्हणून घोषित केले आहे. त्यामुळे सर्व सरकारी आणि खाजगी आरोग्य सुविधांना (वैद्यकीय महाविद्यालयांसह) सर्व संशयित, संभाव्य सर्पदंशांचा अहवाल देणे बंधनकारक आहे, ज्यामुळे संपूर्ण भारतात सर्पदंशाच्या प्रतिबंध आणि उपचारांच्या व्यापक धोरणांसाठी वापरता येणारा डेटा गोळा होऊ शकतो. भारतात, जवळपास ९० टक्‍के सर्पदंश ‘मोठ्या चार’ सापांमुळे होतात यामध्ये कॉमन क्रेट, इंडियन कोब्रा, रसेल्‍स वाइपर आणि सॉ स्केल्ड वायपर यांचा समावेश आहे. सर्पदंशाच्‍या विषामुळे रक्‍तस्त्राव, अर्धांगवायू, उतींचे नेक्रोसिस, स्नायू बिघाड, हृदयविकाराचा झटका, मूत्रपिंडाला तीव्र दुखापत, हायपोव्होलेमिक शॉक आणि मृत्यू यांसारखे गंभीर बहु-अवयव किंवा मल्‍टी-सिस्‍टम नुकसान होऊ शकते.

सर्पदंश झाल्यास काय करावे आणि काय करू नये

पहिले आणि सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे सर्पदंश झालेल्या व्यक्‍तीला उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात घेऊन जावे. उपचार देण्यात होणारा कोणताही विलंब प्राणघातक ठरू शकतो. सर्पदंश झालेल्‍या व्‍यक्‍तीला जवळच्या वैद्यकीय केंद्रात तातडीने घेऊन जा.

सर्पदंश झाल्‍यास काय करावे

  • शांत राहा आणि हालचाली मर्यादित करा, ज्‍यामुळे विष मिसळलेले रक्‍त हृदयाकडे जाणार नाही.
  • सूज येण्याची समस्या टाळण्यासाठी तुमच्या अंगावर असलेले कोणतेही दागिने आणि घट्ट कपडे काढा.
  • विष पसरू नये म्हणून सर्पदंश झालेला भाग हृदयाच्या खाली ठेवा.

काय करू नये

  • जखम धुवू नका.
  • सर्पदंश झालेल्‍या भागाला घट्ट बांधू नका.
  • सर्पदंश झालेल्‍या भागावर टॉर्निकेट किंवा कोल्ड कॉम्प्रेस लावू नका.
  • सर्पदंश झालेला भाग कापू नका किंवा विष बाहेर काढण्याचा प्रयत्‍न करू नका.
  • मद्यपान करू नका किंवा कॅफिन असलेले काहीही पिऊ नका.
  • वेदना होत असल्या तरी स्वतः औषधोपचार करू नका.

ग्रामीण भागात सर्वाधिक सर्पदंशाच्‍या घटना

ग्रामीण भागात सर्पदंशाच्‍या सर्वाधिक प्रकरणे आढळून येतात. एकूण सर्पदंशांपैकी अर्ध्याहून अधिक प्रकरणे ३० ते ५० वर्ष वयोगटातील शेतकऱ्यांमध्ये आढळून येतात आणि ६० ते ८० टक्‍के प्रकरणांमध्‍ये घोटे व पायावर सर्पदंश झाल्‍याचे आढळून येते. मशिनचा वापर न केल्‍या जाणाऱ्या, कमी खर्चाच्या शेती तंत्रांवर आणि अनवाणी शेती पद्धतींवर अवलंबून राहिल्याने शेतकऱ्यांना हात वा पायांवर सर्पदंश होण्‍याचा धोका वाढतो. तसेच, घराची हालाखाची परिस्थिती आणि अपुरा प्रकाश यामुळे साप राहत्या जागांमध्ये सहज प्रवेश करतात, तसेच ते सहज दिसत नाहीत. या अहवालामधून निदर्शनास येते की, ग्रामीण भारतातील सर्पदंश पीडितांपैकी फक्‍त २० ते ३० टक्‍के रुग्ण हॉस्पिटलमध्‍ये उपचार घेतात. अपुरे प्रथमोपचार, उशिरा उपचारांची उपलब्धता आणि कमी दर्जाचे उपचार यामुळे वाईट परिणाम होतात. तसेच, बरेच लोक घरगुती उपचार किंवा ओझा इत्यादी स्थानिक उपचारांचा प्रयत्‍न करतात, ज्यामुळे गुंतागूंत वाढू शकते.

विषारी सर्पदंशावर उपचार करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे दर्जेदार अँटीव्हेनम देणे. उच्‍च दर्जाचे अँटीव्हेनम सर्वोत्तम उपलब्ध उपचार प्रदान करते, जे अनेक मृत्यू टाळण्यास आणि हजारो पीडितांवर परिणाम करणाऱ्या गंभीर अपंगत्वाची तीव्रता कमी करण्यास मदत करू शकते. चांगल्या दर्जाचे अँटीव्हेनम धोक्यात असलेल्या व्‍यक्‍तींच्‍या वैद्यकीय गरजा पूर्ण करण्यासाठी डिझाइन व उत्पादित केले जाते आणि सर्पदंशामुळे होणाऱ्या मृत्यूंविरुद्धच्या आपल्या सामूहिक लढाईत व्यापक वापरासाठी सुरक्षित व गुणकारी आहे.

प्रतिबंधात्‍मक असलेल्‍या सर्पदंशामुळे होणाऱ्या मृत्यूंविरुद्धचा लढा जागरूकता आणि उपलब्‍धतेसाठी महत्त्वाचा आहे. नॅशनल ॲक्‍शन प्‍लॅन फॉर प्रीव्‍हेंशन अँड कंट्रोल ऑफ स्‍नेकबाइट एन्‍व्‍हेनॉमिंग (एनएपीएसई) ही अशीच एक योजना आहे, जी ‘वन हेल्थ’ दृष्टीकोनाच्‍या माध्‍यमातून सर्पदंश व्यवस्थापन, प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी राज्यांना स्वतःचा कृती आराखडा विकसित करण्यासाठी व्‍यापक फ्रेमवर्क प्रदान करते. २०३० पर्यंत सर्पदंशाचे प्रमाण अर्धे करण्‍यासाठी प्रयत्‍न करणे हे एनएपीएसईचे मुख्‍य लक्ष्य आहे. सर्पदंशांवर योग्य पद्धतीने उपचार करूया – योग्य उपचार मिळवण्यासाठी जवळच्या वैद्यकीय सुविधेमध्‍ये जा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *