
मुंबई :
राज्यातील शिक्षकांचे मार्च महिन्याचे वेतन गुढीपाडवा व रमजान ईद पूर्वी करण्यात यावे अशी मागणी मुंबई मुख्याध्यापक संघटनेचे उत्तर विभाग अध्यक्ष व भाजपा प्रदेश कार्यकारिणीचे निमंत्रित सदस्य अनिल बोरनारे यांनी शासनाकडे केली असून बोरनारे यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत शिक्षण आयुक्त कार्यालयाने बोरनारे यांच्या पत्राच्या अनुषंगाने शालेय शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांकडे याबाबत आदेश होण्याची विनंती केली आहे
दि ३० मार्च रोजी गुढीपाडवा व ३१ मार्च रोजी रमजान ईद हे महत्वाचे सण येत असून ते साजरे करण्यासाठी राज्यातील सर्व शासकीय, निम शासकीय, महामंडळातील कर्मचारी तसेच अनुदानित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मार्च महिन्याचे वेतन दि २५ मार्च पूर्वी होणेबाबत अनिल बोरनारे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शिक्षणमंत्री शिक्षण संचालक शिक्षण आयुक्त यांना १३ मार्च रोजी निवेदन देऊन ही मागणी केली आहे
यापूर्वी अनेकदा शासनाने अशा सणांच्या आधी राज्यातील शासकीय कर्मचारी तसेच अनुदानित शाळांमधील शिक्षक शिक्षकेतरांना वेतन दिले असून गुढीपाडवा व रमजान ईद पूर्वी वेतन देण्याची मागणी अनिल बोरनारे यांनी केली आहे