गुन्हे

ॲमेझॉन व फ्लिपकार्ट कंपनीच्या भिवंडी व ठाण्यातील गोदामांवर छापा

मुंबई :

भारतीय मानक ब्युरो (BIS), मुंबई शाखा कार्यालय-II ने ॲमेझॉन सेलर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड आणि इंस्टाकार्ट सर्व्हिसेस (Flipkart ची सहाय्यक कंपनी) प्रायव्हेट लिमिटेडया दोन प्रमुख ई-कॉमर्स कंपन्यांच्या भिवंडी, ठाणे येथील गोदामांवर छापा मारून जप्तीची कारवाई केली.

ॲमेझॉन सेलर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड येथे झालेल्या कारवाईत ९ हजार ९८५ उत्पादने जप्त करण्यात आली, ज्यांची किंमत अंदाजे तीन कोटी इतकी आहे. ही उत्पादने बीआयएस (ISI चिन्ह) प्रमाणपत्राशिवाय विक्रीस ठेवण्यात आली होती. त्याचप्रमाणे, इंस्टाकार्ट सर्व्हिसेस (Flipkart ची सहाय्यक कंपनी) प्रायव्हेट लिमिटेड येथे २४३ इलेक्ट्रिकल व नॉन-इलेक्ट्रिकल खेळणी जप्त करण्यात आली, ज्यांची किंमत तीन लाख आहे.

उल्लंघन करणाऱ्यांवर काय होते कारवाई

ही कारवाई भारतीय मानक ब्युरो कायदा, २०१६ च्या कलम १७ आणि कलम २९ अंतर्गत करण्यात आली असून, अनिवार्य BIS प्रमाणपत्राशिवाय उत्पादन विकण्यास मनाई आहे. दोषींवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे, ज्यामध्ये दोन वर्षांपर्यंत कारावास किंवा किमान दोन लाख दंड होऊ शकतो. वारंवार उल्लंघन केल्यास पाच लाख किंवा जप्त केलेल्या वस्तूंच्या किमतीच्या दहा पट दंडही लागू होऊ शकतो. बीआयएस नियमितपणे अशा अंमलबजावणी कारवाया करत असते, जेणेकरून बाजारात निकृष्ट दर्जाची व नियमबाह्य उत्पादने विकली जाणार नाहीत.

ॲपद्वारे ग्राहकांनी प्रामाणिकता तपासावी

ग्राहकांनी खरेदीपूर्वी BIS Care App द्वारे उत्पादनाची प्रामाणिकता तपासावी आणि ISI चिन्ह, BIS नोंदणी चिन्ह, BIS हॉलमार्क किंवा BIS व्यवस्थापन प्रणाली प्रमाणपत्राचा गैरवापर झाल्यास त्याची तक्रार ईमेल, पत्र किंवा BIS Care App (Google Play Store आणि App Store वर उपलब्ध) द्वारे करावी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *