शहर

शिवसेना मुख्यनेते एकनाथ शिंदे यांनी दिवंगत सहकाऱ्याला केली मदत

पंजाबचे जिल्हाप्रमुख मंगतराम मंगा यांच्या कुटूंबियांना शिवसेनेकडून १० लाखांची मदत सुपूर्द

पंजाब (मोगा) : 

शिवसेनेचे पंजाब राज्याचे जिल्हाप्रमुख मंगतराम मंगा यांच्या अमृतसर येथील मोगा येथील निवासस्थानी पक्षाचे सचिव कॅप्टन अभिजित अडसूळ यांनी भेट देऊन मंगा कुटूंबियांना धीर देत त्यांचे सांत्वन केले. तसेच यावेळी त्यांनी शिवसेनेचे मुख्यनेते एकनाथ शिंदे यांच्या वतीने देण्यात आलेली १० लाखांची मदत मंगा कुटूंबियांना सुपूर्द करण्यात आली.

पंजाब राज्यातील मोगा तालुक्यात खलिस्तानी अतिरेक्यांनी भ्याड हल्ला करून मंगतराम मंगा यांची निर्घृणपणे हत्या केली होती. या घटनेनंतर संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी मोगा-फिरोजपुर हायवे बंद करून आरोपींना त्वरित अटक करण्याची मागणी केली होती. यानंतर स्थानिक पोलिसांनी आतापर्यंत तीन आरोपींना अटक केली असून अन्य आरोपींचा शोध अद्यापही सुरूच आहे.

ही घटना समजताच शिवसेनेचे मुख्यनेते एकनाथ शिंदे यांनी ट्विट करून मंगा यांना श्रद्धांजली अर्पण केली होती. तसेच त्यानंतर पक्षाच्या वतीने शिवसेनेचे राष्ट्रीय सचिव कॅप्टन अभिजित अडसूळ यांना तत्काळ मंगा यांच्या गावी जाण्याचे निर्देश दिले. कॅप्टन अडसूळ यांनी आज मंगा कुटूंबियांची आणि स्थानिक ग्रामस्थांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. तसेच पक्षाच्या वतीने १० लाखांची मदत आणि मंगा यांच्या पत्नीला ऑलिम्पिक असोसिएशनमध्ये नोकरी दिल्याचे पत्र त्यांच्या कुटूंबियांच्या हाती सुपूर्द करण्यात येत असल्याचे जाहीर केले. शिवसेनेने आपल्या दिवंगत सहकाऱ्याबद्दल दाखवलेल्या या कृतज्ञतेबाबत मंगा कुटूंबियांनी शिवसेनेचे आणि पक्षाचे मुख्यनेते एकनाथ शिंदे आणि सचिव कॅप्टन अभिजित अडसूळ यांचे विशेष आभार मानले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *