आरोग्य

कोलोरेक्टल कॅन्सरसाठी अपोलोचा सर्वसमावेशक स्क्रीनिंग कार्यक्रम

नवी मुंबई :

भारतामध्ये कोलोरेक्टल कॅन्सरच्या केसेस सतत वाढत आहेत. कोलोरेक्टल कॅन्सर सुरुवातीच्या टप्प्यात ओळखू यावा आणि त्याला प्रतिबंध घातला जावा यासाठी अपोलो कॅन्सर सेंटर्सने एक सर्वसमावेशक स्क्रीनिंग कार्यक्रम ‘कोलफिट’ सुरु केला आहे. रुग्णांच्या जिवंत राहण्याच्या दरामध्ये सुधारणा व्हावी, उपचारांच्या खर्चात घट व्हावी आणि निदान करण्यात विलंब यासारख्या चिंताजनक समस्या दूर करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. ‘कोलफिट’मध्ये वृद्ध आणि युवक दोघांसाठी देखील सीआरसी स्क्रीनिंग वाढवण्यावर ध्यान केंद्रित करण्यात आले आहे, आजार लवकरात लवकर लक्षात यावा यावर भर देण्यात आला आहे. भारतात सीआरसीचा वय दर दर १,००,००० पुरुषांमागे ७.२ आणि दर १,००,००० महिलांमागे ५.१ आहे, जो खूपच कमी आहे. देशाची लोकसंख्या १ अरबपेक्षा जास्त आहे, त्यामानाने केसेसची संख्या खूप जास्त आहे. त्याहीपेक्षा गंभीर बाब म्हणजे भारतात गेल्या पाच वर्षांमध्ये या आजाराच्या रुग्णांचा जिवंत राहण्याचा दर ४०% पेक्षा कमी आहे.

अपोलो कॅन्सर सेंटर्सच्या ‘कोलफिट’ कार्यक्रमामध्ये फेकल इम्युनोकेमिकल टेस्टचा समावेश आहे. सीआरसी समजून येण्यासाठी या अभूतपूर्व दृष्टिकोनाचा वापर करण्यात आला आहे. हे एक नॉन-इन्वेसिव, अतिशय अचूक स्क्रीनिंग टूल आहे, ज्यामध्ये मलातील रक्त समजून येते, जे सीआरसीचे संभाव्य प्रारंभिक संकेतक आहे. FIT साठी फक्त एकाच नमुन्याची आवश्यकता असते. FIT उच्च संवेदनशीलता प्रदान करते आणि आहारावर प्रतिबंध घालण्याची गरज नसते. हा एक सुविधाजनक आणि रुग्णांसाठी अनुकूल पर्याय आहे.

डॉ पुरुषोत्तम वशिष्ठ, सिनियर कन्सल्टन्ट गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी, अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबई यांनी सांगितले,”आपल्याला कोलोरेक्टल कॅन्सरसाठी रीऍक्टिव्ह केयरऐवजी प्रोऍक्टिव्ह स्क्रीनिंगकडे गेले पाहिजे. अयोग्य आहार, बैठी जीवनशैली आणि स्थूलपणा यासारख्या जीवनशैलीमध्ये उद्भवणाऱ्या कारणांमुळे सीआरसीच्या केसेस वाढत आहेत. जास्त फायबर असलेला आहार, नियमित व्यायाम आणि लक्षणांची वाट न पाहता, स्वतःहून तपासण्या करून घेणे या गोष्टी आजार रोखण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. कोलफिटसह आम्ही FIT च्या माध्यमातून आजार लवकरात लवकर लक्षात येणे सोपे बनवत आहोत, एक सोपे, नॉन-इन्वेसिव परीक्षण गुंतागुंत कमी करू शकते आणि परिणामांमध्ये सुधारणा घडवून आणू शकते.”

डॉ राजेश शिंदे, कन्सल्टन्ट एचपीबी, जीआय, थोरॅसिक ऑन्कोलॉजी आणि रोबोटिक सर्जरी, अपोलो कॅन्सर सेंटर्स मुंबई यांनी सांगितले,”कोलोरेक्टल कॅन्सर भारतामध्ये युवक आणि वयस्क दोघांमध्ये देखील वेगाने पसरत आहे, तरी देखील उशिरा निदान करण्यात येत असल्याने या रुग्णांचा जिवंत राहण्याचा दर खूप कमी आहे ही चिंतेची बाब आहे. जिथे स्क्रीनिंग कार्यक्रम चालवले जातात अशा देशांमध्ये अधिक चांगले परिणाम दिसून आले आहेत, जवळपास ५०% सीआरसी केसेस खूप पुढच्या टप्प्यांमध्ये लक्षात येतात, अजून २०% केसेस मेटास्टेसिससह समोर येतात. (लिंक) हा ट्रेंड उलटवण्यासाठी लवकरात लवकर परीक्षण आणि जागरूकता महत्त्वाची आहे. अपोलो कॅन्सर सेंटर्समध्ये आम्ही रुग्णांना मिळणारे परिणाम अधिक चांगले व्हावेत आणि भारतभर सीआरसीचे ओझे कमी करण्यासाठी कोलफिट, अचूक उपचार आणि सर्वसमावेशक देखभालीच्या माध्यमातून आजार लवकरात लवकर बरा व्हावा यासाठी प्रयत्नशील आहोत.”

बदललेल्या जीवनशैलीमुळे आतड्याच्या कर्करोगात वाढ

धावपळीच्या व ताणतणावाच्या आयुष्यात बदललेली जीवनशैली व आहारातील बदल, व्यायामाचा अभाव, तंबाखू आणि मद्य सेवन, अनियमित झोप, लठ्ठपणा आणि मधुमेह, या सर्व कारणामुळे आतड्याच्या कर्करोगात वाढ होत आहे. वेळीच लक्ष दिले नाही तर हे प्रमाण अजून वाढत जाईल असे वास्तव समोर आले आहे. फायबर कमी आणि प्रोसेस्ड फूड, रेड मीट, जंक फूड यांचे प्रमाण वाढले असल्याने व आहारात भाज्या, फळे, आणि तंतुमय पदार्थ नसल्यामुळे पचनसंस्था कमकुवत होते आहे. त्यामुळे आतड्यांवर ताण येतो. नियमित शारीरिक हालचाल नसल्याने स्थूलता आणि शारीरिक निष्क्रियता आल्याने आतड्यांमध्ये घाण साचून आतड्याचा कर्करोग होण्याचा धोका वाढत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *