क्रीडा

५ व्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धा : सिद्धांत वाडवलकर – प्राजक्ता नारायणकर उपांत्य फेरीत दाखल

मुंबई :

प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुल, विले पार्ले येथे सुरु असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती जुहू यांच्या सहकार्याने उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक पुरस्कृत रोटरी क्लब ऑफ पार्लेश्वर मुंबई आयोजित ५ व्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेच्या पुरुष एकेरी गटाच्या उप उपांत्य फेरीत मुंबईच्या सिद्धांत वाडवलकरने मुंबईच्या निलांश चिपळूणकरला २५-२, २५-१४ असे सहज हरवून उपांत्य फेरी गाठली. तर महिला एकेरी गटाच्या उप उपांत्य फेरीत मुंबई उपनगरच्या प्राजक्ता नारायणकरने ठाण्याच्या चैताली सुवारेला २०-६, १८-२५, २३-१८ असे चुरशीच्या लढतीत हरवून उपांत्य फेरी गाठली.

पुरुष एकेरी उप उपांत्य फेरीचे निकाल

  • प्रशांत मोरे ( मुंबई ) वि वि महम्मद घुफ्रान ( मुंबई ) १६-१२, २५-७
  • अभिजित त्रिपनकर ( पुणे ) वि वि संजय मांडे ( मुंबई ) २३-२४, २५-६, २५-१०
  • पंकज पवार ( ठाणे ) वि वि ओमकार टिळक ( मुंबई ) २५-९, ८-२२, २५-३

महिला एकेरी उप उपांत्य फेरीचे निकाल 

  • समृद्धी घाडीगावकर ( ठाणे ) वि वि अंबिका हरिथ ( मुंबई ) २५-४, २५-०
  • आकांक्षा कदम ( रत्नागिरी ) वि वि श्रुती सोनावणे ( पालघर ) २४-१९, १७-२२, २०-११
  • काजल कुमारी ( मुंबई ) वि वि अंजली सिरीपुरम ( मुंबई ) १७-१०, २५-४

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *