
नवी मुंबई :
अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईने रोबोटिक गुडघे रिप्लेसमेंटच्या २०० सर्जरी यशस्वीपणे पूर्ण केल्या आहेत. हे यश फक्त संख्येपुरते मर्यादित नाही तर २०० लोकांना या हॉस्पिटलने त्यांचे स्वातंत्र्य, मोबिलिटी आणि जीवन गुणवत्ता पुन्हा मिळवून दिली आहे. अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबई रुग्णांच्या देखभालीसाठी वचनबद्ध आहे. याठिकाणी अचूक प्रक्रिया करण्यासाठी प्रगत रोबोटिक तंत्रज्ञान आणि प्रसिद्ध सर्जन्सची नैपुण्ये यांची सांगड घातली जाते, त्यामुळे रुग्णांना वेगवान रिकव्हरी आणि दीर्घकालीन कल्याण यांचे लाभ मिळतात. २०० रोबोटिक गुडघा रिप्लेसमेंटचा टप्पा पार करणे हे अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईचे केवळ एक वैद्यकीय यश नाही तर त्यामुळे २०० व्यक्ती स्वतंत्रपणे चालू-फिरू शकत आहेत आणि अधिक चांगल्या जीवन गुणवत्तेचा आनंद घेत आहेत. आधुनिक तंत्रज्ञान, अतिशय कुशल क्लिनिशियन्स आणि सर्वसमावेशक रिहॅबिलिटेशन यांसह अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबई ऑर्थोपेडिक उत्कृष्टतेची नवी व्याख्या रचत आहे.
हॉस्पिटलमधील आधुनिक रोबोटिक प्रणाली, उच्च गुणवत्तापूर्ण युएसएफडीएने मंजूर केलेल्या प्रत्यारोपणामुळे सर्जरी अतुलनीय अचूकपणे केली जाते, रुग्णांना कमीतकमी असुविधा आणि जास्तीत जास्त मोबिलिटीचे लाभ मिळतात. आर्थोपेडिक तज्ञ, वेदना व्यवस्थापन तज्ञ आणि संसर्ग नियंत्रण प्रोफेशनल्सची तज्ञ टीम यांच्यासह अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबई रुग्णांना आराम मिळवून देण्यास प्राथमिकता देते. त्यामुळे त्यांना अतिशय सुरळीतपणे उपचार करवून घेता येतात. हॉस्पिटलमध्ये प्रगत रिहॅबिलिटेशन सेंटर आहे जे रुग्णांना आत्मविश्वास आणि मोबिलिटी परत मिळवून देण्यात मदत करते, त्यामुळे त्यांना आपली रोजची कामे पुन्हा सुरु करण्यात मदत मिळते.
डॉ संजय धर, सिनियर कन्सल्टन्ट,आर्थोपेडिक्स-रोबोटिक सर्जरी, अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबई यांनी सांगितले,”आमच्या प्रगत रोबोटिक प्रणालीमुळे आम्ही प्रत्येक रुग्णासाठी इम्प्लांट्सच्या अलाइनमेंट्स कस्टमाइज करू शकतो. आम्ही उच्च दर्जेदार, युएसएफडीएने मंजूर केलेल्या इम्प्लांट्सचा उपयोग करतो. अचूक सर्जिकल प्रक्रिया केल्या जात असल्याने सर्जरीनंतर रुग्णांना उत्कृष्ट मोबिलिटी अनुभव मिळतो, अनेक रुग्णांची हीच मोठी चिंता असते. आमचा सर्वसमावेशक देखभाल दृष्टिकोन रुग्णांना सर्जरीनंतर एकाच दिवसात चालण्या-फिरण्यासाठी सक्षम बनवतो.”
डॉ विक्रम पावडे, सिनियर कन्सल्टन्ट, आर्थोपेडिक्स आणि रोबोटिक सर्जरी, अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबई म्हणाले,”मुंबईचे रहिवासी, ५५ वर्षे वयाचे श्री विलास रोकडे यांचे नुकतेच बाय – लॅटरल टीकेआर म्हणजेच दोन्ही गुडघ्यांचे इम्प्लांटेशन केले गेले आणि तरी देखील त्यांना जास्त वेदना झाल्या नाहीत, एकाच आठवड्यात घरी पाठवण्यात आले. ही केस अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईमध्ये आमची देखभाल नैपुण्ये आणि मानके दर्शवते.”
डॉ प्रशांत अगरवाल, सिनियर कन्सल्टन्ट, आर्थोपेडिक्स रोबोटिक सर्जरी, अपोलो हॉस्पिटल्स, नवी मुंबई यांनी सांगितले,”अनुभवी क्लिनिशियन्स, संसर्ग नियंत्रण आणि वेदना व्यवस्थापन टीम्स यामुळे अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईमध्ये टीकेआर प्रक्रिया करवून घेणाऱ्या रुग्णांना उत्तम रिकव्हरीचे लाभ मिळतात. दुसऱ्या देशांमधून आमच्याकडे येणाऱ्या रुग्णांनी देखील सांगितले की, त्यांची खूप चांगली काळजी घेतली गेली आणि ते कोणताही त्रास न होता लवकर बरे झाले.”