
मुंबई :
आजच्या काळात अँटी-डॅंड्रफ शॅम्पू हे अनेक घरांमध्ये एक महत्त्वाचे उत्पादन बनले आहे, जे डोक्यातील डॅंड्रफ आणि खाज यापासून आराम देण्याचे आश्वासन देतात. परंतु, हे शॅम्पू ज्या पध्दतीने स्कॅल्पच्या आणि केसांच्या समस्येवर उपाय देतात त्याच प्रमाणे त्याचे काही तोटे देखील आहेत.
अँटी-डॅंड्रफ शॅम्पूतील काही सामान्य घटक आणि त्यांचे संभाव्य तोटे
१. किटकॅनोझोल
- उद्देश : हे अँटीफंगल एजंट मॅलासेझिया या डँड्रफशी संबंधीत फंगस नियंत्रित करण्यास मदत करते
संभाव्य दुष्परिणाम :
- या घटकामुळे त्वचेसंबंधित त्रास निर्माण होतो, यामुळे त्वचा कोरडी आणि लाल होते. यासोबतच त्वचेला खाज येण्याची शक्यता असते.
- केस गळणे किंवा पातळ होण्याचे प्रमाण वाढते.
- विशेषतः पुरुषांमध्ये, हार्मोनल बदल होऊ शकतात.
2. क्लाइम्बझोल
- उद्देश : किटकॅनोझोल प्रमाणे कार्य करणारा हा एक एंटीफंगल एजंट आहे.
संभाव्य दुष्परिणाम :
- त्वचेची जळजळ, त्वचा कोरडी व लाल होते. डोक्याला खाज सुटते.
- संवेदनशील त्वचेच्या व्यक्तींना ॲलर्जी होऊ शकते.
3. झिंक पिरिथायोन
- उद्देश : मॅलासेझिया या फंगसाच्या वाढीस बाधा आणणारा एंटीफंगल आणि अँटीबॅक्टेरियल एजंट.
संभाव्य दुष्परिणाम :
- त्वचेवर त्रास, ज्यामध्ये कोरडेपण आणि लालसरपणा यांचा समावेश होतो.
- विशेषतः फिकट रंगाचे केस असलेल्या व्यक्तींच्या केसांचा रंग बदलतो.
4. सोडियम लॉरिल सल्फेट (SLS) आणि सोडियम लॉरेथ सल्फेट (SLES)
उद्देश : शॅम्पू मध्ये फेस तयार करणारा घटक
संभाव्य दुष्परिणाम :
- संवेदनशील त्वचेसाठी हानिकारक. त्वचा कोरडी होणे आणि चुरचुरणे.
- या केमिकलमुळे त्वचेचे नैसर्गिक रक्षक असलेल्या घटकां वर दुष्परिणाम होऊ शकतो .\
- डोळ्यात शॅम्पू गेल्यास डोळ्यांना जळजळ होऊ शकते
5. डायमेथिकोन
उद्देश : हा सिलिकॉन-आधारित घटक आहे. जो केसांना स्मूथ आणि चकचकीत बनवतो.
संभाव्य दुष्परिणाम :
- हा घटक डोक्यावर साचत जाण्याची शक्यता असते. ज्यामुळे त्वचेवरील छिद्र बंद होतात आणि त्वचेचा त्रास उद्भवू शकतो.
- केसांच्या नैसर्गिक ओलावा शोषण करण्याच्या क्षमतेत अडथळा निर्माण होऊ शकतो
सामान्य अँटी-डॅंड्रफ शॅम्पूतील या घातक घटकांमुळे केसांचे दीर्घकाळासाठी नुकसान होते. त्यामुळे जे लोक केस आणि स्कॅल्प साठी सौम्य आणि प्रभावी उपाय शोधत आहेत, त्यांनी असे शॅम्पू फॉर्म्युलेशन निवडावे ज्यात सॅलिसिलिक ऍसिड, डॅन्ड्रलीस, परोक्टोन ओलामिन आणि टी ट्री ऑइल हे नैसर्गिक घटक वैद्यकीयदृष्ट्या चाचणी करून वापरलेले जातात. हे घटक अनेक फायदे देतात.
सॅलिसिलिक अँसिड : हे एक बीटा-हायड्रॉक्सी अँसिड आहे जे सौम्यपणे डोक्याची त्वचा स्वच्छ करते, डेड स्किन सेल्स काढून टाकते आणि डॅंड्रफ कमी करते.
डॅन्ड्रलीस : कडुलिंब झाडापासून मिळवलेला हा एक नैसर्गिक घटक आहे. ज्यामध्ये अँटीफंगल आणि अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात
परोक्टोन ओलामिन : हा एक अँटीफंगल एजंट आहे. मॅलासेझिया या डॅंड्रफ साठी कारणीभूत असलेल्या बुरशीला आळा घालण्यास मदत करतो.
टी ट्री ऑइल : हा नैसर्गिक अँटीसेप्टिक आणि अँटीफंगल एजंट आहे. जो डोक्याला शांत करतो आणि जळजळ कमी करतो.
हे घटक प्रभावी पद्धतीने डॅंड्रफ वर उपाय करतात. सामान्य अँटी-डॅंड्रफ शॅम्पूतील घटकांचे संभाव्य दुष्परिणाम समजून घेतल्यामुळे, आपण आपल्या केसांची काळजी योग्य पद्धतीने घेऊ शकतो आणि घातक केमिकल्समुळे होणारे धोके टाळू शकतो.
– नताशा तुली (लेखिका या सोलफ्लॉवर कंपनीच्या सह-संस्थापक आणि सीईओ आहेत.)