
मुंबई :
भारतभर पसरलेल्या अपोलो इकोसिस्टिममध्ये आरोग्य तपासण्या करण्यात आलेल्या २.५ मिलियनपेक्षा जास्त व्यक्तींच्या तपासणी अहवालांच्या आधारे तयार करण्यात आलेल्या अहवालामध्ये एक सायलेंट एपिडेमिक अर्थात साथ देशभर पसरत असल्याचे ठळकपणे दिसून आले आहे. अपोलोने ‘हेल्थ ऑफ द नेशन २०२५’ या आपल्या अहवालाची पाचवी आवृत्ती आज प्रकाशित केली. ‘लक्षणांची वाट पाहू नका – प्रतिबंधात्मक आरोग्याला प्राधान्य द्या’ हा स्पष्ट संदेश या अहवालामध्ये देण्यात आला आहे. देशभरात लाखो व्यक्ती अनेक जुनाट आजारांसह आपले आयुष्य व्यतीत करत आहेत पण कोणतीही गंभीर लक्षणे जाणवत नसल्याने त्यांच्या आजारांचे निदानच करण्यात आलेले नाही. २६% व्यक्तींना हायपर टेन्शन तर २३% व्यक्तींना मधुमेह असल्याचे समजले, पण त्यांना कोणतीही स्पष्ट लक्षणे जाणवत नव्हती. लक्षणे पाहून त्यानुसार दिल्या जाणाऱ्या आरोग्य देखभालीचे मॉडेल आता व्यवहार्य नाही ही बाब यामुळे अधोरेखित होते.
अपोलो हॉस्पिटल्समधील नोंदींनुसार प्रतिबंधात्मक आरोग्य तपासण्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. २०१९ मध्ये १ मिलियन तर २०२४ मध्ये २.५ मिलियनपेक्षा जास्त म्हणजे गेल्या पाच वर्षात १५०% वाढ झाली आहे. प्रतिबंधात्मक आरोग्य देखभालीच्या बाबतीत सार्वजनिक जागरूकता आणि स्वतः पुढाकार घेण्याचा कल वाढत असल्याचे यावरून समजते. ‘हेल्थ ऑफ द नेशन २०२५’ मधील अहवाल हे अपोलोची सर्व हॉस्पिटल्स, क्लिनिक्स, डायग्नोस्टिक लॅब्स आणि वेलनेस सेंटर्समधील डी-आयडेंटिफाइड इलेक्ट्रॉनिक मेडिकल रेकॉर्डस् (प्रतिबंधात्मक आरोग्य तपासण्यांचे ईएमआर), संरचनाबद्ध क्लिनिकल मूल्यांकने आणि एआयवर आधारित रिस्क स्ट्रॅटिफिकेशन यावरून काढले आहेत. फॅटी लिव्हर आजार, रजोनिवृत्तीनंतर आरोग्यामध्ये होणारी घसरण आणि लहान वयातील स्थूलपणा या तीन आरोग्य आव्हानांकडे तातडीने लक्ष देण्याची गरज असल्याचे हा अहवाल सांगतो. लवकरात लवकर, प्रत्येक व्यक्तीला आवश्यक ती आरोग्य देखभाल पुरवली जाणे आणि जीवनशैलीवर आधारित देखभाल मॉडेल्स आणली जाणे गरजेचे असल्यावर यामध्ये भर देण्यात आला आहे.
डॉ सुनीता रेड्डी, मॅनेजिंग डायरेक्टर, अपोलो हॉस्पिटल्स यांनी सांगितले, “हेल्थ ऑफ द नेशन रिपोर्टमध्ये अपोलोने प्रदीर्घ काळापासून जपलेल्या सिद्धांताची पुष्टी करण्यात आली आहे की, आरोग्य देखभालीचे भविष्य हे लवकरात लवकर, माहितीवर आधारित आणि व्यक्तिगत आहे. तपासणी केलेल्या ६६% लोकांमध्ये फॅटी लिव्हर आहे, त्यापैकी ८५% लोक अल्कोहोलमुक्त आहेत; नवीन डायग्नॉस्टिक्स आणि मोठ्या प्रमाणात, लवकरात लवकर निदान करण्याची निकड यावरून समजून येते. पारंपारिक तपासणी यंत्रणा आता पुरेशी नाही. अपोलोचा प्रोहेल्थ कार्यक्रम केवळ व्यक्तींना त्यांच्या आरोग्यावर नियंत्रण ठेवण्यास सक्षम करत नाही तर तो स्केलेबल आणि प्रेडिक्टिव हेल्थकेअरचा पाया रचत आहे. प्रोहेल्थच्या निकालांवरून असे दिसून येते की सातत्यपूर्ण फॉलो-अप, सतत लक्ष वेधून घेणारे उपक्रम आणि रिअल-टाइम डेटासह, आपण मोजता येऊ शकेल इतका, लोकसंख्या-पातळीवरील प्रभाव निर्माण करू शकतो.”
भारताच्या वाढत्या आरोग्य समस्यांचा आढावा
भारतातील नवीन मेटाबोलिक सिग्नल – फॅटी लिव्हर एकेकाळी फक्त अल्कोहोल सेवन करणाऱ्यांसाठी चिंतेचा विषय म्हणून पाहिले जाणारा, फॅटी लिव्हर हा आजार लठ्ठपणा, मधुमेह आणि उच्च रक्तदाबाशी संबंधित एक महत्त्वाचा आरोग्य मुद्दा म्हणून समोर येत आहे. तपासणी केलेल्या २५७,१९९ व्यक्तींपैकी ६५% व्यक्तींमध्ये फॅटी लिव्हर होते आणि त्यापैकी ८५% अल्कोहोल न घेणारे होते.
साध्या दृष्टीक्षेपात लक्षात येणारे हृदयरोग – कोरोनरी कॅल्शियम स्कोअरिंग केलेल्या लक्षणे नसलेल्या व्यक्तींपैकी ४६% मध्ये कॅल्शियमचे साठे आढळले, हे एथेरोस्क्लेरोसिसचे प्राथमिक लक्षण आहे. यापैकी २५% लोकांना ऑब्स्ट्रक्टिव्ह कोरोनरी आर्टरी डिसीज (CAD) होता. आणखी धक्कादायक म्हणजे, कॅल्शियमचे साठे असलेल्यांपैकी २.५% लोक ४० वर्षांपेक्षा कमी वयाचे होते. हे आकडे लवकर धोका शोधण्यासाठी कॅल्शियम स्कोअरिंग आणि सीटी अँजिओग्राफी सारख्या प्रगत इमेजिंग तंत्रांचे महत्त्व दर्शवतात.
महिलांचे आरोग्य : रजोनिवृत्तीनंतर एक गंभीर वळण ‘हेल्थ ऑफ द नेशन २०२५’ अहवालात रजोनिवृत्तीनंतर महिलांसाठी आरोग्य धोक्यांमध्ये खूप जास्त वाढ अधोरेखित केली आहे. रजोनिवृत्तीपूर्वी मधुमेहाचे प्रमाण १४% वरून रजोनिवृत्तीनंतर ४०% पर्यंत वाढले आहे, लठ्ठपणा ७६% वरून ८६% पर्यंत वेगाने वाढला आहे आणि फॅटी लिव्हरचा प्रसार ५४% वरून ७०% पर्यंत वाढला आहे. हे महत्त्वाचे बदल महिलांच्या दीर्घकालीन आरोग्यावर हार्मोनल बदलांचा खोलवर होणारा परिणाम दर्शवतात, रजोनिवृत्ती जवळ येत असताना महिलांसाठी सक्रिय, वैयक्तिकृत आरोग्य धोरणांची आवश्यकता दाखवतात.
मुलांमध्ये लठ्ठपणाचे वाढते प्रमाण : विद्यार्थ्यांमध्ये लठ्ठपणा वेगाने वाढत आहे, त्यांच्या दीर्घकालीन आरोग्यासाठी हे गंभीर धोकादायक आहे. अहवालात असे आढळून आले आहे की प्राथमिक शाळेतील ८% विद्यार्थी आधीच जास्त वजन किंवा लठ्ठ होते – हे एक प्रारंभिक सूचक आहे. किशोरावस्थेमध्ये हे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढते, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये २८% पर्यंत पोहोचते, जीवनशैली आणि आहारातील बदलांचा परिणाम गंभीर असल्याचे यावरून दिसते. याव्यतिरिक्त, १९% महाविद्यालयीन विद्यार्थी प्री-हायपरटेन्सिव्ह असल्याचे आढळून आले, असंसर्गजन्य रोग (एनसीडी) पूर्वीपेक्षा खूप लवकर मूळ धरत असल्याचे यावरून समजते.
उच्च रक्तदाब : एक शांत पण सतत जाणवणारा धोका – २०२४ मध्ये सुमारे ४,५०,००० व्यक्तींची तपासणी केल्यावर असे दिसून आले की २६% व्यक्ती उच्च रक्तदाबाने ग्रस्त होत्या, त्यांना बहुतेकदा कोणतीही लक्षणे नव्हती. भारतामध्ये हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आजारांचे एक प्रमुख कारण उच्च रक्तदाब आहे. याचे निदान खूपच कमी केले जाते आणि त्यावर उपचार केले जात नाहीत. अहवालात प्रमाणित रक्तदाब देखरेख आणि सार्वजनिक आरोग्य मोहिमा करण्याची मागणी केली आहे, रक्तदाब तपासणी हा आरोग्यासाठी करण्यात येणाऱ्या नियमित तपासण्यांचा भाग असणे आवश्यक आहे.
मानसिक आरोग्य : PHQ-9 स्केल वापरून नैराश्यासाठी तपासणी केलेल्या ४७,४२४ व्यक्तींपैकी ७% महिला आणि ५% पुरुषांमध्ये नैराश्याची लक्षणे दिसून आली, तर मध्यमवयीन वर्गात (४०-५५) हा भार वाढत चालला आहे. हे आकडे केवळ वाढती व्याप्तीच नाही तर लवकर उपचार करण्यात अडथळा आणणाऱ्या सामाजिक कलंकावर देखील प्रकाश टाकतात. अपोलो हॉस्पिटल्स नियमित तपासणीमध्ये एकात्मिक मानसिक आरोग्य मूल्यांकन, डिजिटल मानसिक आरोग्य प्लॅटफॉर्मचा व्यापक वापर आणि मोकळेपणा आणि वेळेवर काळजी वाढवण्यासाठी समुदाय-स्तरीय जागरूकता याला प्रोत्साहन देत आहे.
ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप एपनिया (OSA) : द हेल्थ ऑफ द नेशन २०२५ च्या अहवालात एक धक्कादायक ट्रेंड उघड झाला आहे: ४ पैकी १ भारतीयाला ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप एपनिया (OSA) चा खूप जास्त धोका आहे – हा विकार लठ्ठपणा, हृदयरोग आणि दिवसभरातील थकव्याशी खूप जवळून जोडलेला आहे. ५३,००० व्यक्तींच्या तपासणीमध्ये, ३३% पुरुष आणि १०% महिलांना खूप जास्त धोका असल्याचे आढळून आले.ज्यामुळे ६८% पुरुष आणि ५५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या २२% महिलांना त्याचा परिणाम होतो. त्याचे प्रमाण जास्त असूनही, ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप एपनियाचे निदान कमी आहे, बहुतेकदा याला सामान्य थकवा किंवा ताण समजले जाते.
कॅन्सर लक्षात येणे : वयाचे ट्रेंड नवीन इन्साईट्स देतात २०२४ मध्ये, गर्भाशयाच्या ग्रीवेच्या कर्करोगाचे निदान करण्याचे सरासरी वय ४९, स्तनाच्या कर्करोगाचे ५७ आणि फुफ्फुसाच्या कर्करोगाचे ६१ होते – जागतिक सरासरीपेक्षा एक दशक आधी. अहवालात शहरी आणि ग्रामीण लोकसंख्येमध्ये नियमित तपासणी आणि जागरूकता वाढवण्यासाठी वय मर्यादा कमी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
सूक्ष्म पोषक तत्वांची कमतरता : ४५% महिला आणि २६% पुरुषांना अशक्तपणा असल्याचे आढळून आले, तर व्हिटामिन डीची कमतरता ७७% महिला आणि ८२% पुरुषांमध्ये आहे. व्हिटामिन बी१२ ची कमतरता देखील लक्षणीय आहे, ज्यामध्ये ३८% पुरुष आणि २७% महिलांमध्ये पातळी कमी असल्याचे दिसून आले. ४० वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांमध्ये, ही कमतरता आणखी स्पष्ट होती – ४९% पुरुष आणि ३५% महिलांमध्ये व्हिटामिन बी१२ ची कमतरता होती. जर ही कमतरता दूर केली नाही तर ते ऊर्जा, आकलनशक्ती आणि चयापचय कार्यावर परिणाम करू शकतात. राष्ट्रीय पोषण आणि दीर्घकालीन आरोग्य सुधारण्याच्या दिशेने एक आवश्यक पहिले पाऊल म्हणून अपोलोने व्यापक माहिती, जागरूकता प्रसाराची शिफारस करतो.