शिक्षण

दहावी, बारावी बोर्डाची वेबसाईट सायबर सुरक्षित करा – अँड आशिष शेलार यांच्या सूचना

मुंबई : 

दहावी, बारावी बोर्डाच्या वेबसाईटची क्षमता वाढवणे व सायबर सुरक्षित करण्याबाबत येता सात दिवसात अहवाल सादर करा, असे निर्देश माहिती तंत्रज्ञान मंत्री अँड आशिष शेलार यांनी आज दिले. दहावी, बारावी निकालाची तारीखेला विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून वेबसाईट बाबत आढावा घेण्यासाठी आज बोर्डाचे अधिकारी आणि माहिती तंत्रज्ञान विभागाच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक मंत्री अँड आशिष शेलार यांनी घेतली. महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परिक्षा बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी, शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव तुषार महाजन आणि माहिती तंत्रज्ञान विभागाचे संचालक अनिल भंडारी आणि सचिव सदाम आंधळे या बैठकीला उपस्थित होते. यावेळी बोर्डाच्या वेबसाईटची क्षमता व त्यामध्ये येणाऱ्या तांत्रिक अडचणी याबाबत माहिती मंत्री अँड आशिष शेलार यांनी जाणून घेतली.

१० व१२ वीचे निकाल जाहिर झाल्यावर महाराष्ट्रातली लाखो मुले एकाच वेळेस रिझल्ट वेबसाईट वर लॉगईन करुन बघतात. अशावेळेस सदर वेबसाईट वर ताण येउन ती साईट कँश होते व मुलांची गैरसोय होते. सदर वेबसाईट प्रणालीचे सतत लोड टेस्टंग करुन घेणे आवश्यक आहे व त्यानंतर त्याची क्षमता वाढवण्याची आवश्यक्ता आहे. त्यासाठी सध्याच्या वेबसाईटचा क्षमतेचा अहवाल तयार करा, त्या वेबसाईटची क्षमता वाढवण्यासाठी काय करता येईल याबाबत अहवाल तयार करा. तसेच सायबर सेक्युरिटी हा आता महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे यासाठी काय करावे लागेल याचाही अहवाल सात दिवसात द्या असे निर्देश विभागाला देण्यात आले.

महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परिक्षा बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी, शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव तुषार महाजन आणि माहिती तंत्रज्ञान विभागाचे संचालक अनिल भंडारी आणि सचिव सदाम आंधळे या बैठकीला उपस्थित होते. यावेळी बोर्डाच्या वेबसाईटची क्षमता व त्यामध्ये येणाऱ्या तांत्रिक अडचणी याबाबत माहिती मंत्री अँड आशिष शेलार यांनी जाणून घेतली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *