आरोग्य

जागतिक आरोग्य दिनानिमित्त आरोग्य योजनांबाबत मार्गदर्शनव्दारे शिबीर 

मुंबई : 

रुग्ण मित्र साथी संस्था प्रसन्न फाउंडेशनचे सल्लागार विनोद साडविलकर व फाउंडेशनच्या संस्थापिका श्रद्धा अष्टीवकर यांनी कांदिवली (पू) येथील सीआयआय स्किल सेंटर येथील प्रशिक्षणार्थी महिलांसाठी जागतिक आरोग्य दिनानिमित्त ‘वाद नको संवाद पाहिजे, समन्वयातून आरोग्य सेवेचा लाभ पाहिजे’ या संकल्पनेतून महानगर पालिका दवाखाने, प्रसुतीगृह, सर्व साधारण रुग्णालये, आपला दवाखाना, धर्मादाय रुग्णालयात उपचारासाठी उत्पन्न मर्यादा, शासकीय रुग्णालये, राज्य कामगार विमा रुग्णालये व महात्मा फुले जन आरोग्य योजना, आरोग्य मित्र, समाज विकास अधिकारी, समाज सेवा अधिक्षक यांची उपचार पद्धतीसाठी समन्वयातून मदत होत असल्याचे रुग्ण मित्र विनोद साडविलकर यांनी सांगितले.

तसेच सीएससी सेंटर मार्फत अथवा क्यूआर कोडद्वारे टॅली लाॅच्या माध्यमातून कायदेशीर मदतीची प्रक्रिया श्रद्धा अष्टीवकर यांनी सांगितली. मार्गदर्शन आयोजनासाठी संस्था प्रमुख दयाल कांगणे शिलाई व फॅशन कोर्स केंद्रप्रमुख सौरभ शुक्ला व मुख्य शिक्षिका सीमा क्षिरसागर, प्रकाश गुप्ता यांच्या उत्तम नियोजनातून कार्यक्रम यशस्वी संपन्न झाला. रुग्ण मित्र साथी रमेश चव्हाण, चारुदत्त पावसकर, किरण गिरकर, नरसिंगराव होटकर, मिनाक्षी वेलणकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

विनोद साडविलकर यांनी रुग्ण मित्र संस्था भेट चर्चा थेट पुस्तिका सौरभ शुक्ला यांना दिले. कर्करोग बरा होऊ शकतो हे पुस्तक सीमा क्षिरसागर यांना भेट दिले. समाजातील गरजू विद्यार्थ्यांनी सेंटरच्या विविध कोर्सेसचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले‌. भविष्यात सेंटरमध्ये रुग्ण मित्रांच्या साथीने विविध कल्याणकारी उपक्रम आयोजन करण्यासाठी सहकार्य केले जाईल अशी ग्वाही सौरभ शुक्ला यांनी देऊन, मार्गदर्शकांचे व उपस्थितांचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *