क्रीडा

कोल्हापूर राज्य मानांकन स्पर्धेला प्रारंभ

मुंबई :

गंगा भाग्योदय सांस्कृतिक हॉल, कसबा बावडा येथे शंभूराजे फ्रेंड्स सर्कल आयोजित आमदार सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत पुरुष एकेरी गटाच्या पहिल्या फेरीत मुंबईच्या ओमकार नेटकेने मुंबई उपनगरच्या किरण भोपनीकरचा २५-५, ११-२५ व २५-१५ असा तीन सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत पराभव करून तिसऱ्या फेरीत प्रवेश केला.

तत्पूर्वी सकाळी १० वाजता आमदार सतेज पाटील यांच्या शुभहस्ते स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले. याप्रसंगी महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे मानद सचिव अरुण केदार, सहसचिव योगेश फणसळकर व अभिजित मोहिते, खजिनदार अजित सावंत, कोल्हापूर जिल्हा हौशी असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. विवेक घाटगे, सचिव विजय जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्र कॅरम असोसिएशनतर्फे अरुण केदार यांनी आमदार सतेज पाटील यांचा महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे घड्याळ, वार्षिक अहवाल व शुभेच्छा फलक देऊन सत्कार केला.

पुरुष एकेरी गटाच्या दुसऱ्या फेरीचे निकाल

  • निरंजन चारी ( पालघर ) वि वि अजय माळी ( पुणे ) २५-५, २५-०
  • नरसिंगराव सकारी ( मुंबई उपनगर ) वि वि विजय कोंडविलकर ( रत्नागिरी ) २५-१४, २१-१९
  • संजय मणियार ( मुंबई उपनगर ) वि वि धनंजय राऊत ( सातारा ) २५-०, २३-९
  • भरत कोळी ( मुंबई ) वि वि शुभम ढाणे ( सातारा ) २५-४, २५-०

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *